सनी लिओनीचा नंबर झाला लीक? दिली ही प्रतिक्रिया

सनी लिओनीचा नंबर झाला लीक? दिली ही प्रतिक्रिया

गेल्या काही दिवसांपासून Sunny Leone चा फोन नंबर लीक झाला अशा बातम्या सुरू आहेत.

  • Share this:

मुंबई, 03 ऑगस्ट- गेल्या काही दिवसांपासून सनी लिओनीचा फोन नंबर लीक झाला अशा बातम्या सुरू आहेत. हा तोच नंबर आहे जो तिने दिलजीत दोसांज, क्रिती सेनन स्टारर अर्जुन पटियाला सिनेमात दिला होता. हा नंबर सनीचा मुळीच नव्हता पण या नंबरमुळे एका माणसाला फार मनःस्ताप झाला. सनीने सिनेमात जो नंबर सांगितला होता तो नंबर दिल्लीत राहणाऱ्या पुनीत अग्रवालचा निघाला. सिनेमा पाहणाऱ्यांना वाटलं की तो सनीचाच नंबर आहे, त्यामुळे त्यांनी त्या नंबरवर सतत फोन करायला सुरुवात केली. सनीला जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा तिने लगेच यावर प्रतिक्रिया दिली.

त्याचं झालं असं की, ‘अर्जुन पटियाला’ सिनेमात सनी लिओनीने पाहुण्या कलाकाराची भूमिका वठवली होती. सनीने सिनेमात दिलजीतला काल्पनिक फोन नंबर दिला होता. हा नंबर नंतर व्हायरल झाला. हा फोन नंबर दिल्लीमध्ये राहणाऱ्या पुनीत अग्रवालचा होता. अर्जुन पटियाला सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर पुनीतला दिवसाला 300 हून अधिक कॉल आले. आपला अनुभव शेअर करताना पुनीत म्हणाला की, ‘अनेकजण त्याच्याशी अश्लील शब्दांत बोलायचे तर काही त्याला शिव्या द्यायचे. अखेर वैतागून पुनितने पोलिसांकडे तक्रार केली. पण त्याचा फारसा फायदा झाला नाही.’

पुनीतने मौर्या एन्क्लेव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आणि म्हणाला की, माझ्यावर जो अन्याय झाला आहे यासाठी भूषण कुमार आणि दिनेश विजन जबाबदार आहेत. य दोघांविरोधात त्याने तक्रार नोंदवली आहे. सोशल मीडियावर पुनीतला पाठिंबा मिळत आहे. सनीला जेव्हा याबद्दल कळलं तेव्हा यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, ‘सॉरी, मला नव्हतं माहीत की तुमच्यासोबत असं काही झालं.’

एकीकडे सनीच्या काल्पनिक नंबरवरून गोंधळ उडाला तर दुसरीकडे अर्जुन पटियाला सिनेमाने बॉक्स ऑफिसवर फारशी चांगली कमाई केलेली नाही. दिलजीत दोसांज आणि क्रिती सेननच्या अर्जुन पटियाला सिनेमाच्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे सिनेमा चांगलं कलेक्शन करेल असं वाटत होतं. मात्र बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा सपशेल आपटला.

मनसेसमोर अभिनेता अक्षय कुमारची माघार, Mission Mangal चं यू-टर्न

हॉटेलमधून शॅम्पूच्या बाटल्या चोरायची दीपिका, बेस्ट फ्रेंडने सांगितलं गुपित

करण जोहरच्या 'ड्रग पार्टी'विरोधात आमदाराने लिहिलं Open Letter

बॉलिवूडच्या या 5 कपल्सनी सर्वांसमोर दिली होती नात्याची कबुली

विद्या बालनच्या आयुष्यात नवी 'कहाणी' पाहा हा VIDEO

Published by: Madhura Nerurkar
First published: August 3, 2019, 4:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading