सनी लिओन लवकरच देणार 'गुड न्यूज'

हाॅट आणि सेक्सी सनी लिओन पुन्हा एकदा चर्चेत आलीय. ती म्हणालीय, मी कधीही आई होऊ शकते.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jul 19, 2017 02:31 PM IST

सनी लिओन लवकरच देणार 'गुड न्यूज'

19 जुलै: हाॅट आणि सेक्सी सनी लिओन पुन्हा एकदा चर्चेत आलीय. ती म्हणालीय, मी कधीही आई होऊ शकते. एका एन्टरटेन्मेंट चॅनेलला मुलाखत देताना ती म्हणाली, ती आणि तिचा नवरा डॅनिएल छोट्या बाळाची गुड न्यूज कधीही देऊ शकतील.

सनी म्हणाली, ' शारीरिकदृष्ट्या गरोदर होणं मला कठीण जाऊ शकेल. पण माझ्या आयुष्यात बऱ्याच घडामोडी घडतायत. एक दिवस बाळाचं सरप्राईझ तुम्हाला मिळेल. '

सनी बहुदा सरोगसीचाच विचार करतेय. हल्ली बाॅलिवूडमध्ये अनेक जणांनी हा पर्याय स्वीकारलाय. शाहरूख, आमिरपासून कृष्णा अभिषेकपर्यंत. ती हेही म्हणाली, ' मी सरोगसीबद्दल बोंबाबोंब करणार नाही.ही गोष्ट खाजगी राहील. '

आता सनी लिओनच्या फॅन्सना इंतजार आहे तिच्या गुड न्यूजचा.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 19, 2017 02:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...