VIDEO : सनी लिओनीच्या सेटवर अचानक रक्तानं माखलेला हात येऊन पडला आणि...

VIDEO : सनी लिओनीच्या सेटवर अचानक रक्तानं माखलेला हात येऊन पडला आणि...

सनी नेहमीच काम करताना आपल्या को-स्टार्ससोबत मस्ती करताना दिसते. पण यावेळी मात्र सनीच्या सेटवर काहीतरी वेगळंच घडलं.

  • Share this:

मुंबई, 06 सप्टेंबर : बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीनं आता या इंडस्ट्रीमध्ये आपलं स्थान पक्क केलं आहे. अडल्ट इंडस्ट्री ते बॉलिवूड हा तिचा प्रवास तसं पाहायला गेलं तर अजिबात सोप्पा नव्हता. यासाठी तिला अनेक खस्ता खाव्या लागल्या मात्र तिनं हार मानली नाही आणि ती यशस्वी सुद्धा झाली. आता ती बॉलिवूडमधील एक यशस्वी अभिनेत्री तसेच तीन मुलांची आई सुद्धा आहे.

सनी नेहमीच काम करताना आपल्या को-स्टार्ससोबत मस्ती करताना दिसते. पण यावेळी मात्र सनीच्या सेटवर काहीतरी वेगळंच घडलं. अचानकपणे या सेटवर रक्तानं माखलेला हात येऊन पडला आणि सर्वांचीच भीतीनं गळण उडाली. सनीच्या सेटवरील या घटनेचा हा व्हिडीओ स्वतः सनीनं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

Pal Pal Dil Ke Pas Trailer रिलीज, या कारणानं लाँचला पोहोचू शकला नाही सनी देओल

या व्हिडीओमध्ये काही लोक राउंड टेबल मिटिंग करत असल्याचं दिसत आहे. तेवढ्यात अचानक एक रक्तानं माखलेला हात सनीच्या खांद्यावर पडतो. लाल रंगाचा हा हात पाहून सनी घाबरते. मात्र हा खराखुरा रक्तानं माखलेला हात नाही तर एक प्रॅन्क आहे. सनीनं हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला. याच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं, आम्ही सर्वांनी प्रॅन्क करण्याचं ठरवलं होतं आणि आम्ही त्यात यशस्वी सुद्धा झालो.

रात्रीस खेळ चाले : शेवंताच्या बदललेल्या रूपामागचं 'हे' आहे रहस्य

या व्हिडीओ नंतर सनीनं ही ट्रीक तिच्या एका सहकलाकारा सोबतही आजमवली. हा व्हिडीओ सुद्धा सनीनं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला. या व्हिडीओमध्ये सनी आणि तिची टीम काही काम करत आहे. सनी आपल्या नोटपॅडवर काही नोट काढताना दिसत आहे. तर एक महिला उभी राहून त्यांना काहीतरी सांगताना दिसत आहे. या दरम्यान सनी आपल्या बॅगमध्ये काहीतरी शोधू लागते आणि अचानक आपल्या पर्समधून ती तोच लाल रंगाचा हात उभ्या असलेल्या महिलेच्या दिशेनं भिरकावते. अचानक आलेल्या या हातमुळे तिथले सर्वजण घाबरतात. मात्र नक्की काय झालं हे लक्षात येताच सर्वजण हसू लागतात.

'History'वर 'महाकालेश्वर-लीजण्ड ऑफ शिवा'मध्ये इतिहास आणि संस्कृतीचं दर्शन

===============================================================

VIDEO: आरेतील वृक्षतोडीवर उर्मिला मातोंडकर यांचा कडाडून विरोध म्हणाल्या...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 6, 2019 10:19 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading