पतीने केला कामचुकारपणा; सनी लिओनीने घडवली अद्दल पाहा VIDEO

पतीने केला कामचुकारपणा; सनी लिओनीने घडवली अद्दल पाहा VIDEO

लॉकडाऊनमध्ये घरातील कामावरून कित्येक घरांमध्ये पती-पत्नीमध्ये वाद होत आहेत. सनीचा पतीही तिला कामात मदत करत नसल्याने ती वैतागली.

  • Share this:

लॉस एंजेल्स, 11 ऑगस्ट : सध्या लॉकडाऊनमध्ये घरात असल्याने कामावरून वाद होणं साहजिकच आहे. पती-पत्नीमध्ये तर हमखास भांडणं होतच आहेत. घरात असूनही पती कामं टाळत आहेत आणि मग ऑफिस-घरचं काम अशी तारेवरची कसरत करणाऱ्या महिला हैराण झाल्या आहेत. आपल्या कामचुकार पतीला अद्दल कशी घडवावी, हेच अनेकांना समजत नाही आहे. फक्त तुमचाच पती नाही तर अभिनेत्री सनी लिओनीचा पतीही तिला कामात मदत करत नाही आहे त्यामुळे वैतागलेल्या सनीने त्याला चांगली अद्दल घडवली आहे.

सनी लिओनी सध्या आपल्या कुटुंबासह लॉस एंजेल्समध्ये आहे. ती भारतात नसली तरी सोशल मीडियावर सक्रिय आहे आणि भारतातल्या चाहत्यांसह कुटुंबासह घालवलेले क्षण शेअर करत असते. सनी लिओनीने (Sunny Leone) नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती आपल्या घरासमोरील बागेत आहे. एका पार्टीची तयारी सुरू आहे, मात्र काम करणं सोडून डॅनिअल छान झोपलेला आहे.

सनी व्हिडीओमध्ये म्हणते. जेव्हा संध्याकाळी ती पार्टीची तयारी करत होती तेव्हा डेनिअल तिची अजिबात मदत करत नव्हता आणि पूर्ण दिवस ऊन घेत झोपला होता.

आपला पती आपल्याला कामात मदत करत नाही याचा राग सनीला आला आणि तिने नवऱ्याला धडा शिकवायचं ठरवलं.  गाढ झोपेत असलेल्या डेनिअलजवळ तिनं पाण्याने भरलेला फुगा फोडला आणि मग डेनिअल खडबडून जागा झाला.

हे वाचा - अमिताभ यांची नात आराध्या आजोबांसारखी बोलते हिंदी; ऑनलाईन शाळेचा VIDEO VIRAL

सनीने शेअर केलेला हा व्हिडीओ म्हणजे एक प्रँक आहे. डेनिअलसह प्रँक करणं खूपच सोपं आहे. तो माझी खूप मदत करतो आणि म्हणूनच तो झोपला होता. डेनिअल खूप चांगला नवरा आहे,  असं सनीने या व्हिडीओसह केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. दरम्यान सनीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

Published by: Priya Lad
First published: August 11, 2020, 11:16 AM IST

ताज्या बातम्या