VIDEO : सनी लिओनीची टीव्ही बघायची पद्धत पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल

VIDEO : सनी लिओनीची टीव्ही बघायची पद्धत पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल

Sunny Leone | Sunny Leone Instagram | सनीनं तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर नुकताच एक व्हिडिओ शेअर केला ज्यात ती टीव्ही पाहताना दिसत आहे.

  • Share this:

मुंबई, 30 जून : झी टीव्ही वरील शो, ‘कुमकुम भाग्य’ छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय शो मानला जातो. या मालिकाच्या चाहत्यांची यादीही खूप मोठी आहे. ज्यात बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिओनीचाही समावेश आहे. पण सनीची टीव्ही पाहण्याची स्टाइल थोडी हटके आहे. सनीनं तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर नुकताच एक व्हिडिओ शेअर केला ज्यात ती टीव्ही पाहताना दिसत आहे. मात्र यावेळी टीव्ही म्यूट केलेला असून सनी या शोमधील अभिनेता आणि अभिनेत्रीचे डायलॉग स्वतःच म्हणताना दिसत आहे.

लग्न जो-सोफीचं पण चर्चा मात्र प्रियांकाच्या देसी लुकची, पाहा फोटो

सनीनं तिच्या सोशल मीडियावर शेअर केलेला हा व्हिडिओ खूपच गंमतीशीर आहे. या व्हिडिओमध्ये सनी हा शो पाहताना टीव्ही म्यूट करून त्यांचे डायलॉग बोलताना दिसत आहे. मात्र हे डायलॉगही खूप मजेदार आहेत. सनी स्वतःच्याच अंदाजात या मालिकेत कलाकारांचे डायलॉग बोलत त्यांना तडका लावताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना सनीनं ती हा टीव्ही शो पाहून अ‍ॅक्टिंगची प्रॅक्टिस करत असल्याचं सांगितलं आहे. सनीनं लिहिलं, धन्यवाद ‘कुमकुम भाग्य’, श्रीति झा आणि शब्बीर अहलूवालिया. तुमचा शो पाहणं माझा बेस्ट टाइमपास असतं, जेव्हा मी हा शो माझ्या कमेंट्रीशिवाय पाहते.

VIDEO : सलग 36 सेकंद 'आझादी'वर बोलणाऱ्या या मुलीचा सलमानही झाला चाहता

सनीनं या व्हिडिओला तिचं आगामी वर्कशॉप म्हटलं आहे. त्यामुळे कदाचित सनी या मालिकेतून अभिनयाचे बारकावे आणि एक्सप्रेशन्स शिकण्याचा प्रयत्न करत असेल. सनी लवकरच ‘अर्जुन पटियाला’ या सिनेमात पाहुण्या कलाकारच्या भूमिकेत दिसणार आहे. हा एक रोमँटिक, कॉप स्पूफ कॉमेडी सिनेमा आहे. या सिनेमात दिलजीत दोसांझ, वरुण शर्मा आणि कृती सेनन यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. येत्या 26 जुलैला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

'ही' मराठमोळी अभिनेत्री मुलासाठी अमेरिकेत शोधतेय कॉलेज

===============================================================

VIDEO: कंडक्टर मुलीला आंटी म्हणाला आणि बसमध्ये झाला राडा

First published: June 30, 2019, 1:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading