पतीसोबत सनी लिओनीचा देसी डान्स, व्हिडीओ व्हायरल

पतीसोबत सनी लिओनीचा देसी डान्स, व्हिडीओ व्हायरल

सनीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेला हा व्हिडीओ आतापर्यंत 18 लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे.

  • Share this:

मुंबई, 09 एप्रिल : बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिओनी सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते. ती नेहमीच तिचे व्हिडीओ किंवा फोटो शेअर करत असते. नुकताच सनीनं एक डान्स व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला. हा व्हिडीओ सध्या सगळीकडे मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सनी तिचा पत्नी डॅनिअल वेबरसोबत कंगणा रनौतच्या एका सुपरहिट गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

You know!! Just because we wanted to end the night right with a little dance for you! @sunnyrajani @geege_on_video @ricardoferrise1 @dirrty99

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on

सनीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेला हा व्हिडीओ आतापर्यंत 18 लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. या व्हिडीओमध्ये सनी टिक टॉकवर कंगणाच्या तनु वेड्स मनु' मधील 'साडी गली' या गाण्यावर डान्स करत आहे. या गाण्यात सनी सोबत तिचा पती डॅनिअल वेबरसुद्धा डान्स करताना दिसत आहे. सनी एकदम देसी अंदाजात काम करताना दिसत असून या आधीही सनीचा देसी अंदाजात डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये सनी 'दलेर मेहंदी' मधील 'बोलो ता रा रा' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

Yup.. We are crazy!! @indiatiktok video series #2 with @shezaadakakkar #SunnyLeone #TikTokwithSunny

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on

सनी लिओनीनं 'जिस्म 2' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. बिग बॉस शो दरम्यान महेश भट यांनी सनीला या सिनेमाची ऑफर दिली होती. बॉलिवूडमध्ये तिला स्वतःची ओळख मिळवायला बराच संघर्ष करावा लागला. 2017 मध्ये निशाला दत्तक घेतलं. तर मार्च 2018 मध्ये सरोगसी द्वारे अशर आणि नोआह अशा दोन जुळ्या मुलांना जन्म दिला. 2018मध्ये सनीची 'करनजीत कौर- द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओनी' ही वेब सीरिज रिलीज झाली. यात तिचा संपूर्ण जीवनपट दाखवण्यात आला आहे.

First published: April 9, 2019, 4:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading