आई म्हणणाऱ्या विद्यार्थ्याला सनी लिओनीचं मजेदार उत्तर म्हणाली...

आई म्हणणाऱ्या विद्यार्थ्याला सनी लिओनीचं मजेदार उत्तर म्हणाली...

बिहारमध्ये (Bihar) एका कॉलेज विद्यार्थ्यांच्या युनिव्हर्सिटी परीक्षेच्या अ‍ॅडमिट कार्डवर(Admit Card) त्याने आईचं नाव अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) असं लिहिलं होतं.

  • Share this:

मुंबई, 13 डिसेंबर: बॉलिवूड स्टार्सच्या अनेक क्रेझी फॅन्सबद्दल तुम्ही ऐकलं असेलच, पण आपल्या आवडत्या अभिनेत्रीला आई आणि अभिनेत्याला बाप म्हणवून घेणं हे जरा अतीच झालं. बिहारमध्ये एका कॉलेज विद्यार्थ्याने  प्रताप केला आहे.

युनिव्हर्सिटीच्या परीक्षेच्या अ‍ॅडमिट कार्डवर (Admit Card) त्याने वडिलांच्या जागी अभिनेता इम्रान हाश्मी (Emraan Hashmi) आणि आईच्या जागी अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) हिचं नाव लिहिलं होतं. बिहारमधील एका 20 वर्षीय विद्यार्थ्याने विद्यापीठ प्रशासनाची फसवणूक करत हे अ‍ॅडमिट कार्ड तयार केले आहे. येथील बी.ए. दुसर्‍या वर्षाच्या विद्यार्थ्याच्या बनावट अ‍ॅडमिट कार्डचा स्क्रीनशॉट (Screenshot)  सोशल मीडियावर (Social Media) जोरदार  व्हायरल झाला होता. ही  बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून इम्रान हाश्मी आणि त्यानंतर सनी लिओनीपर्यंत पोचली. यावर सनी लिओनीने ट्विट करुन प्रतिक्रिया दिली आहे.

सनीने तिच्या ट्विटर कंमेंट मध्ये लिहलं आहे, 'हे मूल छान आहे आणि सनीचा मुलगा होणं हे एक मोठे स्वप्न आहे ... एक्सओ हाहााहा '.

यापूर्वी या व्हायरल पोस्टवर इमरान हाश्मीने ट्विट करत प्रतिक्रिया दिली होती, की शपथ घेऊन सांगतो,तो माझा मुलगा नाही. हे फेक युनिव्हर्सिटी ऍडमिट कार्ड  कुंदन कुमार या विद्यार्थ्यांचं असू शकतं असा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे. सध्या हा प्रकार कोणी केला आहे हे शोधण्याचं काम सुरू आहे. तो बिहारमधील धनराज महतो डिग्री कॉलेजचा(Dhanraj Mahto Degree College) विद्यार्थी आहे. बिहारमधील (Bihar) मिनापूर येथील या कॉलेजमध्ये हा विद्यार्थी बीएच्या दुसऱ्या वर्षांमध्ये शिकत आहे. या अ‍ॅडमिट कार्डवर वडिलांच्या नावासमोर त्याने इम्रान हाश्मी याचे नाव लिहिलेले आढळून आलं आहे. नावाच्या स्पेलिंगमध्ये थोडा फरक असला तरीदेखील ते अभिनेता इम्रानचंच नाव असल्याचं लक्षात येत आहे. त्याचबरोबर आईच्या नावाच्या रकान्यात बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीचं नाव लिहीलं होतं.

Published by: News18 Desk
First published: December 13, 2020, 3:28 PM IST

ताज्या बातम्या