पैशांसाठी बहिणीचे फोटो विकायचा सनी लिओनीचा भाऊ

पैशांसाठी बहिणीचे फोटो विकायचा सनी लिओनीचा भाऊ

फार कमी लोकांना माहीत आहे की, सनी आणि तिचा भाऊ संदीप यांच्यात फार चांगलं बॉण्डिंग आहे. सनीने तिचं नावही भावाच्या नावावरूनच चोरलं आहे.

  • Share this:

मुंबई, 16 मे- सनी लिओनीचं आयुष्य हे जणू खुल्या पुस्तकासारखं आहे. बालपणी शाळेत सहन करावी लागलेली अवहेलना असो किंवा तरुणपणी पॉर्न इंडस्ट्रीमध्ये केलेलं काम असो... सनीने कधीच कोणत्या गोष्टी लपवल्या नाहीत. हे साऱ्यांनाच माहीत आहे की सनी स्वखुशीने पॉर्न सिनेमांमध्ये काम करायची. तिच्यावर पैशांचा पाऊस तर पडत होताच, शिवाय तिचा भाऊही आपल्या पॉकेटमनीचा खर्च सनीमार्फत वसुल करायचा.

Inside Photos- कधीकाळी विकी कौशल असाही दिसायचा यावर तुमचा विश्वास बसणार नाही

याबद्दलचा खुलासा सनीचा भाऊ संदीप वोहराने 'मोस्टली सनी' या सिनेमात केला. संदीप म्हणाला की, त्याने सनीच्या ऑटोग्राफच्या मदतीने खूप पैसा कमावला. आपल्या या कामाबद्दल बोलताना संदीप म्हणाला की, जेव्हा तो हॉस्टेलमध्ये राहायचा तेव्हा तो सनीने ऑटोग्राफ केलेला पोस्टर भिंतीवर चिकटवायचा. जेव्हाही कधी सनीचा चाहता संदीपच्या खोलीत यायचा तेव्हा तो पोस्टर विकत घ्यायचा. मनाजोगते पैसे मिळाल्यावर संदीप ते पोस्टर द्यायचा. एक पोस्टर गेल्यानंतर संदीप दुसरं पोस्टर लगेच भिंतीवर लावायचा. संदीपला आजही या गोष्टीवर फार हसू येतं.

Cannes 2019 - कंगना रणौतने 10 दिवसांमध्ये कमी केलं 5 किलो वजन, लोक म्हणाले- अशक्यच!

फार कमी लोकांना माहीत आहे की, सनी आणि तिचा भाऊ संदीप यांच्यात फार चांगलं बॉण्डिंग आहे. सनीने तिचं नावही भावाच्या नावावरूनच चोरलं आहे. संदीपला घरात सारे सनी या नावाने हाक मारतात. जेव्हा तिने पॉर्न इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवलं तेव्हा तिने सनी लिओनी हे नाव वापरायला सुरुवात केली.

पिवळ्या साडीतील ती बोल्ड महिला अधिकारी सलमानची फॅन, व्यक्त केली एक इच्छा

पुलवामातील 3 दहशतवाद्यांच्या एन्काउंटरनंतरचा LIVE VIDEO

First published: May 16, 2019, 3:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading