सनी लिओनला कर्नाटकात येऊ देऊ नका, कन्नड रक्षण वेदिकेचं आंदोलन

सनी लिओनला कर्नाटकात येऊ देऊ नका, कन्नड रक्षण वेदिकेचं आंदोलन

कन्नड संघटनेच्या विरोधानंतरही सनी लिओन ३ नोव्हेंबर रोजी बंगळुरूमध्ये एका कार्यक्रमात सहभागी होणार आहे

  • Share this:

संदीप राजगोळकर, प्रतिनिधी

बंगळुरू, 22 आॅक्टोबर : बाॅलिवूडची अभिनेत्री सनी लिओन विरोधात कन्नड रक्षण वेदिका संघटनेनं आंदोलन केलंय. आंदोलकांनी सनी लिओनचे पोस्टर जाळून निषेध व्यक्त केला. तसंच सनी लिओनला बंगळुरूमध्ये येऊ देऊ नका अशी मागणीही केलीये.

"वीर महादेवी" या तमिळ चित्रपटात सनीची मुख्य भूमिका आहे. सनीने वीर महादेवीची भूमिका साकारल्यामुळे कन्नड रक्षण वेदिका संघटनेनं आक्षेप घेतलाय.

त्यामुळे आज सोमवारी टाऊल हॉल इथं कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सनी लिओनच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत पोस्ट जाळले. तसंच सनी लिओनला कर्नाटकमध्ये पाय येऊ देऊ नका असा विरोधही संघटनेनं केलाय.

कन्नड संघटनेच्या विरोधानंतरही सनी लिओन ३ नोव्हेंबर रोजी बंगळुरूमध्ये एका कार्यक्रमात सहभागी होणार आहे. पोलिसांनीही सनी लिओनला या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी परवानगी दिलीये.

वीरामादेवी एक योद्धा होती आणि सनी लिओनने वीरामादेवींची भूमिका साकारून अपमान केलाय असं कन्नड संघटनेचं म्हणणंय.

===================================================================

First published: October 22, 2018, 6:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading