...आणि सनी लिओन बनली लातूरच्या चिमुकलीची आई !

...आणि सनी लिओन बनली लातूरच्या चिमुकलीची आई !

सनी लिओन आता आई झाली आहे. सनी आणि तिचे पती डॅनियल वेबर या दोघांनी लातूरच्या एका...

  • Share this:

20जुलै : बाॅलिवूडची अभिनेत्री सनी लिओन आता आई झाली आहे. सनी आणि तिचे पती डॅनियल वेबर या दोघांनी लातूरच्या एका 21 महिन्यांच्या मुलीला दत्तक घेतलंय. सूत्रांनुसार, सनी आणि डॅनियलने या मुलीचं नाव 'निशा' ठेवलंय.

बुधवारी सनीने आई होण्याची इच्छा व्यक्त केली होती. सनी म्हणाली होती,"कोण जाणे कुठून तरी एक बाळ घेऊन येईन आणि तुम्ही विचाराल हे बाळं कुठून आलं".

ती जसं म्हणाली तसं काहीसं झालंही. सनी आई झाल्याच्या बातमीने सगळेच शॉक झाले आहेत. सनीने केलेल्या वक्तव्यावरून ती सरोगसी करेल असा अनेकांनी अंदाज बांधला होता.

सनीला मुलं खूप आवडतात. ती एकदा मीडियाशी बोलताना म्हणाली होती, "माझं लहान मुलांशी खूप पटतं, आम्ही वेड्यासारखे एकामेकांच्या जवळ येतो. नशिबात असेल तर एक दिवस मी आई होईन आणि त्यादिवशी मी देवाचे लक्ष लक्ष आभार मानेन."

विशेष म्हणजे मे महिन्यात सनी लिओन लातूरमध्ये एकाच जिमच्या उद्घाटनाला आली होती.

First published: July 20, 2017, 11:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading