S M L

जेव्हा सनी लिओन मॉलमध्ये अडकते...

त्या अंधारात कोण अडकलं माहितीये? तुम्ही नाव ऐकलंत, तर होश उड गये अशीच स्थिती होईल तुमची! ती व्यक्ती होती सनी लिओन.

Updated On: Aug 31, 2018 05:41 PM IST

जेव्हा सनी लिओन मॉलमध्ये अडकते...

मुंबई, 31 आॅगस्ट : हम तुम एक कमरे मे बंद हो और चाबी खो जाए. आणि अशीच चावी हरवली. दरवाजे काही उघडेनात. वीज गेली. पूर्ण अंधार. आणि त्या अंधारात कोण अडकलं माहितीये?  तुम्ही नाव ऐकलंत, तर होश उड गये अशीच स्थिती होईल तुमची! ती व्यक्ती होती सनी लिओन.

सनी लिओनची लोकप्रियता बॉलिवूडमध्ये दिवसेंदिवस वाढतच चाललीय. जिथे कुठेही ती जाते तिथे लोक तिला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी करतात, असंच काहीसं मुंबईत पार पडलेल्या एका कार्यक्रमातही घडलं. मुंबईतल्या एका मॉलमध्ये कपड्यांच्या ब्रँण्डच्या उद्घाटनासाठी सनी आली होती. मात्र तिला पाहण्यासाठी फॅन्सनी मॉलबाहेर प्रचंड गर्दी केली. गर्दी आटोक्यात येत नसल्याने मॉलचे दरवाजे बंद करावे लागले. मात्र तब्बल तासाभरानंतर ते उघडण्याचा प्रयत्न केला असता ते अडकून पडले. त्यातच मॉलमधली वीजही गेली. त्यामुळे तब्बल तासभर सनी या मॉलमध्येच अडकून पडली.

या माॅलचे दरवाचे अॅटोमॅटिक होते. त्यामुळे ते बंद पडले होते आणि ते सुरू व्हायला वेळ लागला.तोपर्यंत सनी आणि तिचा नवरा घामाघुम होऊन बसले होते. एक तासानंतर दरवाजे उघडले. तसे दोघं बाहेर पडले.

सनी लिओनला आता लोक तिच्या पॉर्न चित्रपटांमुळे नाही तर अभिनय, डान्स आणि सामाजिक कामामुळे ओळखतात. एवढंच नाही तर ती आता पॉर्नस्टारवरून एक फेमस सेलेब्रिटी बनली आहे. जेव्हा सनी डॅनियलला पहिल्यांदा भेटायला गेली तेव्हा ती उशिरा पोहोचली. त्यांच्या पहिल्या डेटवर त्याने खास वागणूक दिली. त्यावेळी त्यांनी ३ तास एकत्र वेळ घालवला. आमच्याकडे पाहून असं वाटतच नव्हतं की ही आमची पहिली भेट आहे, सनी सांगते.

दो दिवाने मेक्सिकोत, प्रियांका-निकची शहरात भटकंती!

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 31, 2018 05:41 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close