News18 Lokmat

पाॅर्न इंडस्ट्री सोडलेल्या सनीनं पुन्हा केलं न्यूड शूट

सनीनं पेटा (PETA) या प्राण्यांसाठी काम करणाऱ्या संस्थेसाठी शूट केलंय.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Nov 29, 2017 01:47 PM IST

पाॅर्न इंडस्ट्री सोडलेल्या सनीनं पुन्हा केलं न्यूड शूट

29 नोव्हेंबर : सनी लिओन आणि तिचा नवरा डॅनियल वेबर यांनी नुकतंच न्यूड शूटिंग केलंय. पाॅर्न इंडस्ट्री सोडून बाॅलिवूडमध्ये स्थिरावत असलेल्या सनीनं का बरं असं केलं, असे विचार तुमच्या मनात आले असतील, तर खरं कारणही ऐका. सनीनं पेटा (PETA) या प्राण्यांसाठी काम करणाऱ्या संस्थेसाठी शूट केलंय.

या फोटोमागची भावना अशी आहे की तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी जशी घेता, तशी काळजी प्राण्यांच्या त्वचेची घ्यावी. त्यांच्या कातडीपासून पदार्थ बनवू नका, असं पेटाचं सांगणं आहे.

Loading...

पेटा इंडियानं या फोटो शूटचे फोटोज ट्विट केलेत. फॅशन इंडस्ट्रीत अनेक सौंदर्यप्रसाधनं, वस्तू प्राण्यांच्या कातडीपासून बनतात. त्यासाठी प्राण्यांना मारलं जातं. त्यावर प्रतिबंध करण्याची मोहीम सनीनं उघडलीय.

सनी लिओनचा तेरा इंतजार सिनेमा 1 डिसेंबरला रिलीज होतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 29, 2017 01:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...