सनी लिओननं साजरा केला मुलगी निशाचा वाढदिवस हटके

सनीने जुलै महिन्यात निशाला दत्तक घेतलं होतं. सनी आणि तिचा नवरा डेनियल वेबर याने निशाला लातूरमधून दत्तक घेतलं होतं.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Oct 16, 2017 02:02 PM IST

सनी लिओननं साजरा केला मुलगी निशाचा वाढदिवस हटके

16 आॅक्टोबर : बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओननं आपली मुलगी निशा कौर वेबरचा वाढदिवस खास पद्धतीने साजरा केला आहे. सनीने जुलै महिन्यात निशाला दत्तक घेतलं होतं. सनी आणि तिचा नवरा डेनियल वेबर याने निशाला लातूरमधून दत्तक घेतलं होतं.

डेनियलने ट्विटरवरून या वाढदिवसाची एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात सनी आणि डेनियल निशाला सरप्राईज पार्टी देण्याची तयारी करताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये डेनियलने असं लिहिलंय आहे की, "तुझ्या मुलीच्या वाढदिवसाची सरप्राईज पार्टी. आमची प्रेमळ लाडकी निशा कौर वेबर"

Loading...

त्या ट्विटरवर उत्तर देत सनी म्हणाली, "आपल्या कुटुंबासह आणि सर्व मित्रांसोबत खास दिवस आमची मुलगी 2 वर्षांची आहे. आमच्या आयुष्यातील एक किरण, वाढदिवसाच्या शुभेच्छा निशा कौर वेबर"

Disney for Nisha's birthday!! Where all your dreams come true

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on

डेनियलने शुक्रवारी इंस्टाग्रामवर त्याचा आणि सनीचा फोटो शेअर केला आणि त्यावर तो  म्हणाला, "डिझनीलँड...निशाचा वाढदिवस...स्वप्नवत दिवस".

Disneyland !!! Nisha’s bday :). Amazing day !!! @sunnyleone

A post shared by Daniel "Dirrty" Weber (@dirrty99) on

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 16, 2017 02:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...