सनी देओलचा मुलगा करणचं बाॅलिवूड पदार्पण

सनी देओलचा मुलगा करणचं बाॅलिवूड पदार्पण

चित्रपट आहे 'पल पल दिल के पास'. याचं दिग्दर्शन स्वत: सनी देओल करतोय.

  • Share this:

24 मे : आता सनी देओलचा मुलगा करण देओल बाॅलिवूडमध्ये पदार्पण करतोय. चित्रपट आहे 'पल पल दिल के पास'. याचं दिग्दर्शन स्वत: सनी देओल करतोय.

चित्रपटाचं शूटिंग मनालीमध्ये सुरू झालेय. याबद्दल स्वत: सनीने ट्विट केलंय. त्याने मुलाचा फोटो शेयर करत सिनेमाचं शूटिंग सुरू झाल्याचं म्हटलंय. सनी देओलने दिग्दर्शित केलेला हा  तिसरा चित्रपट आहे.

'पल पल दिल के पास' रोमॅंटिक आहे. पण या चित्रपटाची हिरोईन कोण आहे, हे अजूनही सांगण्यात आलं नाहीय.

सनीने देखील आपल्या पहिल्या चित्रपटाची सुरुवात 'बेताब' या रोमॅंटिक चित्रपटापासून केली होती. आता देओल कुटुंबातल्या तिसऱ्या पिढीने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आहे. करण लोकांचं मन कसं जिंकतोय, हे पहाणं महत्त्वाचं ठरेल.

First published: May 24, 2017, 12:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading