Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

सनी देओलचा आवाज ऐकताच कपिल शर्माची उडाली घाबरगुंडी; गर्लफ्रेंडच्या प्रश्नावर करणची अशी होती प्रतिक्रिया

सनी देओलचा आवाज ऐकताच कपिल शर्माची उडाली घाबरगुंडी; गर्लफ्रेंडच्या प्रश्नावर करणची अशी होती प्रतिक्रिया

 अभिनेता सनी देओलचा (Sunny Deol) मुलगा करण देओलचा(Karan Deol) दुसरा चित्रपट वेल्ले (Velle) लवकरच प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठीच सनी देओल आणि करणसह चित्रपटातील इतर स्टार कास्टनी द कपिल शर्मा शोच्या (The Kapil Sharma Show) स्टेजवर हजेरी लावली.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 02 डिसेंबर: अभिनेता सनी देओलचा (Sunny Deol) मुलगा करण देओलचा(Karan Deol) दुसरा चित्रपट वेल्ले (Velle) लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे 10 डिसेंबरला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे प्रमोशन जोरात सुरू आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठीच सनी देओल आणि करणसह चित्रपटातील इतर स्टार कास्टनी द कपिल शर्मा शोच्या (The Kapil Sharma Show) स्टेजवर हजेरी लावली. या एपिसोडचा प्रोमो नुकताच रिलिज झाला असून प्रेक्षकांकडून त्याला चांगलीच पसंती मिळत आहे.

लोकप्रिय टीव्ही शो 'द कपिल शर्मा शो' चाहत्यांना खळखळून हसवत असतो. कपिल शर्माच्या या शोमध्ये अनेक सेलिब्रिटी गेस्ट म्हणून हजेरी लावत असतात. तसेच ते आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठीही येत असतात. पाहुण्यांसोबत कपिल आणि कलाकार हास्य विनोद करत दर्शकांचे मनोरंजन करत असतात. नुकताच द कपिल शर्मा शोचा एक प्रोमो आला आहे. यामध्ये कपिल शर्मासोबत अभिनेता सनी देओलचा मुलगा करण दिसत आहे.

कपिल केली देओल फॅमेलिच्या डान्सची थट्टा

2 मिनिटे 13 सेकंदांच्या या प्रोमोच्या सुरुवातीला कपिल शर्मा करण देओलला विचारतो, 'तुझे आजोबा धर्मेंद्र, काका बॉबी देओल आणि वडील सनी देओल(Dharmedra, Bobby Deol & Sunny Deol) यांच्यापैखी कोणाला डान्समध्ये तू फॉलो करता? तसेच, डान्स करताना कपिल स्वतः करणला म्हणतो, 'मी की पापा'? यानंतर तो वडिलांना मोठ्याने हाक मारतो. त्यानंतर शोमध्ये सनीचा गर्जना करणारा आवाज ऐकू येतो, काय झालं? त्याच्या आवाजाने संपूर्ण सेट थरथरू लागतो. कपिलही घाबरतो आणि मग सनी देओलची धमाकेदार एन्ट्री होते.

यानंतर प्रोमोमध्ये सनी देओल त्याच्या 'यारा ओ यारा' या सुपरहिट गाण्याचे हुक स्टेप करताना म्हणतो की, यापेक्षा चांगला डान्स कोणी करू शकतो का? मग कपिल शर्मा सनी देओलला प्रश्न विचारतो, 'तुम्हाला अशा तीन गोष्टींची नावे द्यावी लागतील जी जमिनीतून उखडता येतील'? यावर सनी देओल हसतो आणि म्हणतो, 'गाजर, मुळा...' इतक्यात शोमध्ये बसलेल्या एका प्रेक्षकाचा आवाज येतो... आणि हँडपंप. यावर सगळे हसायला लागतात.

वाचा : कतरिना-विकीने केली कोटींची डील; आंतरराष्ट्रीय मासिकाला विकले लग्नाच्या फोटोंचे हक्क

कपिल शर्माने करण देओलला त्याच्या गर्लफ्रेंडबद्दल विचारले. कपिलच्या या प्रश्नावर करण काहीशा लाजत उत्तर देतो. त्याचवेळी सनी देओल यावर म्हणतो की, आमच्या काळात खूप काही लाजत बुजत व्हायचे. सनीने इतकं बोलताच शोमध्ये पुन्हा सगळे हसायला लागले. प्रोमोमध्ये कृष्णा अभिषेकही सपनाच्या गेटअपमध्ये दिसत आहे.

वाचा : 'मुलीवर गोष्ट आली तर सहन करणार नाही'; आराध्याला ट्रोल करणाऱ्यांवर भडकला अभिषेक बच्चन

कृष्णा सर्वांसमोर म्हणतो की, आज अर्चना पूरण सिंगचा चित्रपट येत असल्याने मला खूप आनंद होत आहे. यावर कपिल शर्मा म्हणतो की, अर्चनाचा नाही तर करण, सावंत आणि विशेषचा 'वेल्ले' चित्रपट येत आहे. कपिलने हे सांगताच कृष्णाने अर्चनाकडे बोट दाखवत म्हणतो की तिच्यापेक्षा मोठा वेल्ला कोण आहे? मात्र, या स्पेशल एपिसोडचा प्रोमो पाहता हा एपिसोड खूपच धमाकेदार असणार आहे, असे दिसते. 'वेल्ले' हा चित्रपट 10 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.

First published:

Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood News, Entertainment, Sunny deol