अधुरी एक कहाणी- ...म्हणून प्रेम असूनही आज एकत्र नाहीत सनी देओल आणि डिंपल कपाडिया

अधुरी एक कहाणी- ...म्हणून प्रेम असूनही आज एकत्र नाहीत सनी देओल आणि डिंपल कपाडिया

'मंजिल मंजिल' या सिनेमात सनी आणि डिंपल यांची ओळख झाली. या ओळखीचं रुपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमात कधी बदललं त्यांचं त्यांनाच कळलं नाही.

  • Share this:

मुंबई, २३ एप्रिल- राज कपूर यांनी त्यांचा मुलगा ऋषी यांना बॉलिवूडमध्ये लॉन्च करण्यासाठी बॉबी सिनेमा काढला. या सिनेमात त्यांनी ऋषीच्या अपोझिट डिंपल कपाडियाची निवड केली. बॉबी सिनेमा सुपरहिट ठरला होता. एका रात्रीत डिंपल स्टार झाली होती. वयाच्या १६ व्या वर्षी डिंबल स्टारडम काय असतं ते अनुभवत होती. बॉबी सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच तिने बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांच्याशी लग्न केलं होतं. लग्नानंतर त्यांनी जवळपास ११ वर्षांचा ब्रेक घेतला. त्यांनी आपलं कमबॅक ऋषी कपूर यांच्यासोबतच केलं.

धर्मेंद्र यांची पत्नी हेमा मालिनी यांच्यासोबत कसं आहे सनी देओलचं नातं?

१९८५ मध्ये 'मंजिल मंजिल' या सिनेमात सनी आणि डिंपल यांची ओळख झाली. या ओळखीचं रुपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमात कधी बदललं त्यांचं त्यांनाच कळलं नाही. एक दोन वर्ष नाही तर तब्बल ११ वर्ष दोघांचं रिलेशनशिप सुरू होतं. सनी आणि डिंपल यांचं नातं कोणापासूनही लपलं नाही.

लोकसभा निवडणूक 2019- सनी देओलची भाजपमध्ये एण्ट्री, पंजाबच्या या जागेवरून लढवू शकतो निवडणूक

एवढंच नाही तर असंही म्हटलं जातं की, डिंपलच्या मुली सनीला 'छोटे पापा' नावाने हाक मारायच्या. मात्र सनीचं तेव्हा लग्न झालं होतं. तो दोन मुलांचा बापही होता. सनीला आपल्या पत्नीला आणि मुलांना सोडायचं नव्हतं त्यामुळे सनी डिंपलचं नातं पूर्णत्वाला जाऊ शकलं नाही. गेल्या वर्षी पुन्हा एकदा दोघांना लंडनच्या रस्त्यांवर एकमेकांसोबत वेळ घालवताना पाहण्यात आले. सनी आणि डिंपल एकमेकांच्या हातात हात घालून निवांत गप्पा मारतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.

या मुस्लिम अभिनेत्रीशी मनोज वाजपेयीने केलं होतं दुसरं लग्न

First published: April 23, 2019, 3:05 PM IST
Tags:

ताज्या बातम्या