नवी दिल्ली, 26 सप्टेंबर : हिंदी सिनेमाच्या इतिहासातील सर्वात यशस्वी अभिनेत्यांपैकी एक असलेल्या धर्मेंद्र (Dharmendra) यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. आपल्या प्रत्येक भूमिकेमधून लोकांची मने जिंकणाऱ्या धर्मेंद्र यांनी 1960 मध्ये 'दिल भी तेरा, हम भी तेरे' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आणि नंतर तीन दशकं चित्रपटसृष्टीवर वर्चस्व गाजवलं. बॉलिवूडचे 'ही-मॅन' म्हणून प्रसिद्ध असलेले धर्मेंद्र यांचे वैयक्तिक आयुष्यही नेहमी चर्चेत राहिलं आहे. त्यांची आणि हेमा मालिनीची (Hema Malini) जोडी पडद्यावर खूप हीट झाली होती.
धर्मेंद्र आणि हेमा मालिनी या जोडीवर लोकांनी अपार प्रेमाचा वर्षाव केला आहे. कदाचित याच कारणामुळं धर्मेंद्र यांनी त्यांची पहिली पत्नी असतानाही ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांच्याशी दुसरे लग्न केलं. धर्मेंद्र यांची पहिली पत्नी प्रकाश कौर यांना या लग्नामुळे मोठा धक्का बसला होता तर सनी देओल (sunny deol) आणि बॉबी देओल (Bobby deol) सुद्धा खूप चिडले होते.
हे वाचा - Indian Army : बर्फ वितळल्यामुळे जवानाचा मृतदेह दिसला; 16 वर्षांपासून कुटुंब होतं प्रतीक्षेत
सनी देओल त्याची आई प्रकाश कौरवर खूप प्रेम करतो. आईची ही अवस्था पाहून सनी देओल संतापला होता. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी 1980 मध्ये दीर्घ अफेअरनंतर लग्न केलं होतं. पण धर्मेंद्र आधीच विवाहित होते, त्यांनी चित्रपटांमध्ये चमकण्यापूर्वीच प्रकाश कौर यांच्याशी 1954 मध्ये लग्न केलं होतं.
असे सांगितले जाते की, सनी देओलला धर्मेंद्र आणि हेमाच्या लग्नाची बातमी मिळताच तो भंयकर चिडला होता. रागाच्या भरात तो हेमा मालिनीवर चाकूने हल्ला करणार होता. धर्मेंद्रच्या दुसऱ्या लग्नामुळे प्रकाशही रागावल्या होत्या मात्र, त्यांनी आपलं दुःख फारसं व्यक्त केलं नाही. एका मुलाखतीत जेव्हा प्रकाश कौर यांना विचारण्यात आलं की सनीने खरोखरच हेमावर चाकूने हल्ला केला होता का?
हे वाचा - मोठ्या दीराने हातोडाच घातला वहिनीच्या डोक्यात; भावालाही संपवलं; कारण वाचून धक्काच बसेल
यावर प्रकाश यांनी उत्तर दिलं की, ही खरी गोष्ट नाही. त्या म्हणाल्या की 'प्रत्येक मुलाला आईला सुखात पाहायला आवडत असते. सनीलाही तेच हवे होते, पण त्याच्याविषयी जे बोलले जाते तसे त्याने केले नव्हते. मात्र, हे नक्की की तो खूप संतापला होता. हेमा मालिनीशी लग्न करण्यासाठी धर्मेंद्रने आपला धर्म आणि नाव बदलले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood News, Sunny deol