डिंपल-सनीची 'प्यारवाली लव्ह स्टोरी' पुन्हा चर्चेत, लंडनमधला व्हिडिओ व्हायरल

डिंपल-सनीची 'प्यारवाली लव्ह स्टोरी' पुन्हा चर्चेत, लंडनमधला व्हिडिओ व्हायरल

या व्हिडिओमध्ये सनी आणि डिंपल कपाडिया एका बसस्टाॅपवर सोबत बसलेले आहे. आणि दोघांचा एकमेकांच्या हातात हात आहे.

  • Share this:

 27 सप्टेंबर : नव्वदच्या काळात मोठ्या पडद्यावर गाजलेली जोडी सनी देओल आणि डिंपल कपाडिया नुकताच एका व्हिडिओत एकत्र सापडले आहे. या व्हिडिओमध्ये सनी आणि डिंपल कपाडिया एका बसस्टाॅपवर सोबत बसलेले आहे. आणि दोघांचा एकमेकांच्या हातात हात आहे.

सनीने टोपी घातलेली आणि डिंपलच्या गळ्यात स्कार्फ आहे. डिंपलच्या एका हातात सिगरेट आणि दुसरा हात हा सनी देओलच्या हातात आहे. असं सांगितलं जातंय हा व्हिडिओ लंडनमध्ये रेकाॅर्ड करण्यात आलाय.

गंमतीशीर बाब म्हणजे, हा व्हिडिओ स्वत:ला चित्रपट समीक्षक म्हणून घेणाऱ्या केआरकेनं टि्वट केलाय.

सनी देओल आणि डिंपल कपाडिया यांचं खूप जुनं नातं आहे. या दोघांनी सोबत 5 सिनेमे एकत्र साकारले आहे. याच दरम्यान दोघांमध्ये जवळीक वाढली होती.

परंतु, त्यावेळी सनी आणि डिंपलने लग्न केलं नाही. दोघांनीही वेगवेगळ्या व्यक्तींसोबत लग्न केलं. पण त्यानंतरही सनी आणि डिंपलच्या प्रेमप्रकरणाची चर्चा कायम राहिली.

राजेश खन्ना यांच्यापासून वेगळं झाल्यानंतर डिंपल आणि सनी देओलचं नातं कायम होतं. असं म्हणतात, सनी देओलच्या आयुष्यात रविना टंडनची एंट्री झाल्यानंतर डिंपल कपाडिया यांनी सनीपासून दूर जाणं पसंत केलं होतं.

पण, हा व्हिडिओ समोर आल्यानंतर आजही दोघांचं नातं कायम आहे का असा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. अलीकडेच सनी देओलचा पोस्टर बाॅयज हा सिनेमा रिलीज झालाय. सनी देओल सध्या आपल्या मुलाला लाँच करण्याच्या तयारीत आहे. अशातच हा व्हिडिओ व्हायरल झालाय.

First published: September 27, 2017, 5:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading