मुंबई, २८ जानेवारी २०१८- मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे आणि मिताली बोरूडे हे दोघं काल लग्न बंधनात अडकले. त्यांच्या लग्नाला राजकीय वर्तुळातून जेवढे पाहुणे आले होते त्याहून जास्त पाहूणे हे सिनेसृष्टीतून आले होते.
लग्नाला ज्यांना येणं शक्य नव्हतं त्यांनी आवर्जुन रिसेप्शनला हजेरी लावली.
अमिताभ बच्चनपासून ते सलमान खानपर्यंत अनेक बॉलिवूड तारकांनी नववधू वरांना शुभाशीर्वाद दिले.
बॉलिवूडचा अण्णा अर्थात सुनील शेट्टीही सपत्नीक अमित ठाकरेच्या रिसेप्शनला आला होता. यावेळी त्याने कॅमेरामनच्या सांगण्यावरून जोडीने काही फोटो दिले. फोटो काढून झाल्यानंतर अण्णा फोटोग्राफर्सना भेटायला गेला.
गेल्या अनेक वर्षांपासून सुनील शेट्टी या फोटोग्राफर्सना पाहत असल्यामुळे ते एकमेकांना ओळखतात. यावेळी एका फोटोग्राफरने सुनील शेट्टीच्या बायकोला मराठीत सांगितलं की, ‘मॅडम अण्णाला बांधून ठेवा भारी दिसतायेत ते...’ त्याच्या या वाक्यावर अण्णाची बायको आणि अण्णा दोघंही हसायला लागले.
फोटोग्राफरने केलेलं हे कौतुक बायकोला जरी आवडलं तरी अण्णाला फारसं आवडलेलं दिसलं नाही. त्यानेही मराठीत फोटोग्राफरला जसंच्या तसं उत्र देत म्हटलं की, ‘काय बोलतोस तू पण… तेव्हा गेलो नाही तर आता कुठे जाणार... आता तर दाढीही पिकली…’ सुनीलच्या या वाक्यावर तिथे उपस्थित सगळेच फोटोग्राफर आणि कॅमेरामन हसायला लागले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा