कपिल शर्माला टक्कर देण्यासाठी सुनीलचा नवा शो; शोमध्ये रणवीर, सारासोबत आणखी कोण दिसणार?

सुनील ग्रोवर आणि कपिल शर्माने भारतीय प्रेक्षकांना एकत्र मिळून हसवलं आहे परंतु आता सुनील ग्रोवर त्याचा स्वतंत्र शो घेऊन येत आहे.

News18 Lokmat | Updated On: Nov 21, 2018 05:57 PM IST

कपिल शर्माला टक्कर देण्यासाठी सुनीलचा नवा शो; शोमध्ये रणवीर, सारासोबत आणखी कोण दिसणार?

गेल्या अनेक दिवसांपासून सुनील ग्रोवर आणि कपिल शर्मा एकत्र काम करणार असल्याची बातमी पसरत होती. सलमान खानमुळे सुनील कपिलसोबत काम करणार असल्याच म्हटलं जातं होतं. पण आता सुनील ग्रोवर त्याचा स्वत:चा कॉमेडी शो घेऊन येत आहे.

कपिल शर्माची एक्स गर्लफ्रेंड प्रीती सिमोस या कार्यक्रमाची निर्मिती करणार असून कपिलच्या कार्यक्रमाला टक्कर देण्यासाठी सुनील तयार आहे. 'कानपूरवाले खुरानाज' असं या शोचं नाव असणार आहे. स्टार प्लस वाहिनीवर हा शो प्रदर्शित होणार आहे.

या शोमधून सैफ अली खानचा भाऊजी कुणाल खेमू पहिल्यांदा टेलिव्हिजनवर काम करताना दिसणार आहे. यासोबतच अली असगर, सुगंधा मिश्रा आणि उपासना सिंह देखील असणार आहे. सुनीलसोबत दिग्गज विनोदी कलाकार असल्याने कार्यक्रम चालेल अशी आशा आहे.

Loading...

सुनील ग्रोवरच्या 'कानपूरवाले खुरानाज' शोची सुरुवात एका धमाकेदार चित्रपटाच्या प्रोमोशनने होणार आहे. रणवीर सिंग आणि रोहित शेट्टी सिंबा चित्रपटाचं प्रोमोशनसाठी येणार असून शोच्या दुसऱ्या भागात सारा अली खान आणि करण जोहर देखील सहभागी होणार आहेत.

बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांच्या एंट्रीने 'कानपूरवाले खुरानाज' कार्यक्रमाचा प्रारंभ होणार असल्यानं शोची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. नुकताच शोच्या प्रोमोचं शुटिंग पूर्ण झालं असून डिसेंबरमध्ये हा शो प्रसारित करण्यात येईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 21, 2018 05:57 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...