आईच्या वाढदिवसाचं निमित्त कपिल आणि सुनीलचा वाद मिटवणार?

कपिलच्या एका ट्विटवर सुनील ग्रोवरनं प्रतिक्रिया दिल्यानं त्या दोघांमधील वाद मिटेल अशी आशा चाहत्यांना वाटते.

News18 Lokmat | Updated On: Jan 17, 2019 11:48 AM IST

आईच्या वाढदिवसाचं निमित्त कपिल आणि सुनीलचा वाद मिटवणार?

कॉमेडियन कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांच्यातील वाद जगजाहीर आहे. कपिल आणि सुनील ग्रोवर यांच्यातील बाद मिटावा अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा आहे. आतापर्यंत तशी काही चिन्हं दिसत नव्हती पण आता त्यांच्या चाहत्यांना आनंद होईल अशी गोष्ट झाली आहे.

सुनील ग्रोवर सोशल मिडियावर नेहमी अॅक्टिव्ह असतो. त्यानं कपिलच्या एका ट्विटरवर प्रतिक्रिया दिल्यानं त्या दोघांमधील वाद मिटेल अशी आशा चाहत्यांना वाटते.

सोमवार, दि. १४ जानेवारी) कपिल शर्मानं आईच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी पोस्ट केली होती. त्यानंतर अनेकांनी कपिलच्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यावर सुनील ग्रोवरनंदेखील कपिलच्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Loading...

सुनीलच्या या ट्विटचं अनेकांनी कौतुक केलं आहे. आता सुनिल आणि कपिल हे दोघेही एकत्र टेलिव्हिजनवर दिसतील अशी चर्चा सुरू आहे.

कपिलने लग्नानंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे. त्याची दुसरी इनिंग जबरदस्त सुरू आहे. तर सुनीलचा 'कानपुर वाले खुरानाज' हा शो बंद होण्याच्या मार्गावर आहे. याबाबत सुनील ग्रोवर म्हणतो की, सध्या ''भारत'च्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्यानं या शोसाठी जास्त वेळ देता येत नाही.

कपिल आणि सुनील यांनी कॉमेडी नाइटस् मधून आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. सुनील ग्रोवरनं साकारलेलं गुत्थीचं विनोदी स्त्री पात्र गाजलं होतं. पण कपिल आणि सुनीलमध्ये मतभेद झाल्यानं सुनील बाहेर पडला. त्यानंतर त्यानं सुरू केलेल्या शोला म्हणावा तितका प्रतिसाद मिळाला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 17, 2019 11:44 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...