...म्हणून Bharat च्या सेटवर कतरिना कैफनं सुनील ग्रोवरच्या कानशीलात लगावली

...म्हणून Bharat च्या सेटवर कतरिना कैफनं सुनील ग्रोवरच्या कानशीलात लगावली

सध्या सलमान आणि कतरिना भारतच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत मात्र या सर्वात सुनील ग्रोवर मात्र यातील कोणत्याही प्रमोशन इव्हेंटला दिसलेला नाही.

  • Share this:

मुंबई, 1 जून : कॉमेडियन सुनील ग्रोवर Bharat सिनेमातून पहिल्यांदा सलमान खान आणि कतरिना कैफसोबत काम करत आहे. सध्या सलमान आणि कतरिना भारतच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत मात्र या सर्वात सुनील ग्रोवर मात्र यातील कोणत्याही प्रमोशन इव्हेंटला दिसलेला नाही. पण नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सुनीलने 'भारत'च्या शूटिंग दरम्यान कतरिना कैफनं त्याच्या जोरात कानशीलात लगावल्याचा खुलासा केला.

सुनीलनं सांगितलं, सलमान आणि कतरिना कैफसोबत काम करताना मी खूप एंजॉय केलं. यावेळी सुनीलनं भारतच्या सेटवरील कतरिनाने त्याच्या कानाखाली मारल्याचा किस्सा शेअर केला. सुनील म्हणाला, 'या सिनेमामध्ये एक सीन असा आहे ज्यात कुमुद विलायतीच्या कानशीलात मारते. हा सीन शूट करणं आमच्यासाठी खूप कठीण गेलं.'

तारक मेहता फेम दिशा वकानीनं खरेदी केली लक्झरी कार, किंमत ऐकून व्हाल चकीत

 

View this post on Instagram

 

Schedule wrap#bharat @aliabbaszafar went for shopping

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on

सुनील पुढे म्हणाला, 'या सिनेमामध्ये माझ्या व्यक्तिरेखेचं नाव 'विलायती' आहे. एका सीनमध्ये मी बोट लावून चेक करतो की, ती मॅडम सर आहे का नाही आणि त्यानंतर कुमुद त्याच्या कानाखाली मारते. हा सीन शूट करताना मला हसू आवरत नव्हतं. शेवटी कतरिनानं माझ्या जोरदार कानशीलात लगावली ज्याचा आवाज घुमला आणि सलमान जोरजोरात हसू लागला. हा सीन शूट करणं मला खूप कठीण गेलं.'

दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूरने रिक्रिएट केलं बलम पिचकारी गाणं, तुम्ही पाहिलात का VIDEO?

'भारत' सिनेमा त्याच्या नावामुळे फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर जगातही प्रदर्शनाआधीच लोकप्रिय झाला आहे. नुकताच ट्विटरनंही या सिनेमासाठी एक स्वतंत्र इमोजी सुद्धा दिला आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित 'भारत' सिनेमा ईदच्या मुहूर्तावर 5 जूनला प्रदर्शित होत असून यात सलमान खान, कतरिना कैफ, दिशा पाटनी, जॅकी श्रॉफ, तब्बू, सुनील ग्रोवर आदींच्या महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहेत.

#MeeToo प्रकरणातून विकास बहल सुटला, पुन्हा एकदा झाला सुपर 30 चा दिग्दर्शक

First published: June 1, 2019, 3:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading