मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /सुनील ग्रोव्हर मोठ्या पडद्यावर करणार रोमान्स

सुनील ग्रोव्हर मोठ्या पडद्यावर करणार रोमान्स

सध्या डाॅक्टर मशहुर गुलाटी नक्की काय करतायत? म्हणजेच काॅमेडियन सुनील ग्रोव्हर. कपिलबरोबरच्या भांडणामुळे सुनील ग्रोव्हर जास्त चर्चेत आला. कपिल आणि सुनीलचं भांडण, पॅच अप शो बंद अशा बऱ्याच कहाण्या रंगल्या.

  मुंबई, 25 आॅगस्ट : सध्या डाॅक्टर मशहुर गुलाटी नक्की काय करतायत? म्हणजेच काॅमेडियन सुनील ग्रोव्हर. कपिलबरोबरच्या भांडणामुळे सुनील ग्रोव्हर जास्त चर्चेत आला. कपिल आणि सुनीलचं भांडण, पॅच अप शो बंद अशा बऱ्याच कहाण्या रंगल्या. पण आता अजून एक बातमी समोर आलीय. आजवर आपल्या अदाकारीने सगळ्यांना हसवणारे डॉक्टर मशहुर गुलाटी म्हणजेच कॉमेडीयन सुनील ग्रोव्हर आता चक्क रोमान्स करताना दिसणारेत. सलमान खानसोबत 'भारत' सिनेमात सुनील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. यात तो कॉमेडीसोबत चक्क रोमान्स करताना दिसणारे. त्याला या नव्या अवतारात पाहणं त्याच्या चाहत्यांसाठी निश्चितच मोठं इंटरेस्टिंग असेल.

  भारतमध्ये नोरा फतेह अलीची एंट्री झाल्यावरही अनेकांनी भुवया उंचावल्या. असं म्हणतात की सुनील ग्रोव्हर आणि नोरा फतेह अलीचा एक रोमँटिक ट्रँक सिनेमात आहे. पण हा रोमान्स काॅमेडी आहे. सध्या सिनेमाचं शूटिंग माल्टा इथे चाललंय.

  जाॅनच्या सत्यमेव जयतेमध्ये नोराचं आयटम साँग होतं. युट्युबवर त्याला 100 दशलक्ष व्ह्यूजही होते. त्यामुळे नोराची जादू भारतमध्येही चालवायचीय. शिवाय त्याला सुनील ग्रोव्हरच्या काॅमेडीचा तडकाही आहे.

  सलमान खानच्या 'भारत'चं शूटिंग सुरू झालंय आणि सिनेमातला सलमानचा लूकही समोर आलाय.  भारत सिनेमाचं दिग्दर्शन अली अब्बास जफर यांनी केलंय. सलमान खान या सिनेमात 5 लूकमध्ये दिसणार आहे. वय वर्ष 25 ते वय वर्ष 65पर्यंतचा त्याचा प्रवास या सिनेमात आहे.

  कतरिना कपूर या सिनेमात आता प्रियांकाच्या जागी असणार आहे. दिग्दर्शक अली अब्बासनं मुंबई मिररशी बोलताना सांगितलं, ' मी कतरिनासोबत काम करायला खूप खूश आहे. कतरिना आणि सलमान एकत्र पडद्यावर आले की एकदम हिट जोडी ठरते.'

  अली, सलमान आणि कतरिना तिघांनी एकत्र काम 'टायगर जिंदा है'मध्ये केलं होतं. सलमान-कॅट दबंग, एक था टायगर, मैने प्यार क्यूं किया अशा सिनेमांमध्ये एकत्र होते. सलमान आणि कतरिनाचं अफेअरही गाजलं होतं. सलमानला कतरिनाबद्दल साॅफ्ट काॅर्नर आहे, हे तर सगळ्यांना माहीत आहे.

  VIDEO : राज ठाकरेंनी रेखाटलं अटलजींचं व्यंगचित्र

  First published:

  Tags: Bharat, Romance, Salman khan, Sunil grover, भारत, रोमान्स, सलमान खान, सुनील ग्रोव्हर