Home /News /entertainment /

VIDEO - 'लग्नाच्या नावाने तुला काय होतं?'; 'अमिताभ बच्चन' यांच्या प्रश्नावर सलमान खानने अशी दिली प्रतिक्रिया

VIDEO - 'लग्नाच्या नावाने तुला काय होतं?'; 'अमिताभ बच्चन' यांच्या प्रश्नावर सलमान खानने अशी दिली प्रतिक्रिया

कॉमेडियन आणि होस्ट मनीष पॉलने (Maniesh Paul) एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात 'अमिताभ बच्चन' सलमान खानला त्याच्या लग्नाबाबत विचारताना दिसले.

मुंबई, 15 जानेवारी : बॉलिवूडचा भाईजान, दबंग खान अशा एक ना अनेक नावांनी ओळखला जाणारा अभिनेता सलमान खान (Salman Khan) चित्रपट किंवा वैयक्तिक आयुष्यामुळे सातत्याने चर्चेत असतो. त्याचं वय वाढलं असलं, तरी बॉलिवूडमधला मोस्ट एलिजिबल बॅचलर म्हणून त्याला ओळखलं जातं. सलमान खान आणि त्याचं लग्न हा बॉलिवूड इंडस्ट्रीतला सर्वांत मोठा चर्चेचा विषय असतो. सलमानचं नाव आजपर्यंत अनेक अभिनेत्रींशी जोडलं गेलं आहे; पण कोणतंच नातं लग्नापर्यंत गेलं नाही. त्यामुळेच आजही सलमान खान अविवाहित आहे.  तो कुठेही गेला तरी त्याला लग्नाबाबत प्रश्न विचारला जातो. आता तर 'अमिताभ बच्चन' (Amitabh bachchan) यांनीही सलमान खानला लग्नाबाबत विचारण केली (Amitabh bachchan advise to salman khan to get married) . त्यानंतर नेमकी सलमानची प्रतिक्रिया कशी होती, याचा व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. कॉमेडियन आणि होस्ट  मनीष पॉलने (Maniesh Paul) आपल्या यूट्यूब चॅनलवर 'दबंग टूर'चा (Da-Bangg tour) एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये 'दबंग टूर'मधल्या बॅकस्टेजपासून ते कार्यक्रमातली धमाल-मस्ती पाहायला मिळत आहे. रियाधमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 'दबंग टूर'मध्ये सलमान खानसोबत प्रभू देवा, शिल्पा शेट्टी, आयुष शर्मा आणि सई मांजरेकर यांनी परफॉर्म केलं. यातच सुनील ग्रोव्हरनेदेखील आपल्या अभिनयाने सर्वांना हसवलं. हे वाचा - 'मला आई व्हायचंय, परंतु....' प्रियांका चोप्राचा फॅमिली प्लॅनिंगवर मोठा खुलासा यावेळी सुनील ग्रोव्हर बिग बी अमिताभ बच्चन यांच्या वेशात स्टेजवर आला आणि 'कौन बनेगा करोडपती' शोच्या स्टाइलमध्ये त्याने सलमान खानला लग्नासंदर्भात प्रश्न केला. लग्नाच्या नावाने तुला काय होतं? असा प्रश्न विचारत लग्न कर असा सल्लाही दिला. सुनीलचं बोलणं ऐकून सलमानला हसू आवरत नसल्याचं पाहायला मिळालं. हे वाचा - गौहर खानचा फोटो काढताना पापाराझींकडून घडलं असं काही, भडकली अभिनेत्री, पाहा VIDEO सुनील ग्रोव्हरबद्दल बोलायचं झालं, तर तो आपल्या अभिनयाच्या जोरावर घराघरात पोहोचला आहे. गुत्थी या भूमिकेतून त्याने प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं आहे. कपिल शर्माच्या शोमध्ये सुनीलने गुत्थीची भूमिका साकारली होती. सुनील ग्रोव्हर कपिल शर्मा कॉमेडी शोमध्ये विनोदी भूमिका साकारायचा आणि प्रेक्षकांना खूप हसवायचा. मतभेदांमुळे सुनील कार्यक्रमातून बाहेर पडला; पण तो कपिल शर्मा कॉमेडी शोमध्ये परतेल अशी आशा त्यांच्या चाहत्यांना आहे.
First published:

Tags: Entertainment

पुढील बातम्या