मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /सुनील शेट्टीची Love Story होती एकदम फिल्मी; प्रेयसीसाठी पाहिली 9 वर्ष वाट

सुनील शेट्टीची Love Story होती एकदम फिल्मी; प्रेयसीसाठी पाहिली 9 वर्ष वाट

या यशस्वी अभिनेत्याला बॉलिवूडबरोबरच वैयक्तिक आयुष्यातही संघर्ष करावा लागला. त्याला लग्नासाठी 9 वर्षं वाट पहावी लागली.

या यशस्वी अभिनेत्याला बॉलिवूडबरोबरच वैयक्तिक आयुष्यातही संघर्ष करावा लागला. त्याला लग्नासाठी 9 वर्षं वाट पहावी लागली.

या यशस्वी अभिनेत्याला बॉलिवूडबरोबरच वैयक्तिक आयुष्यातही संघर्ष करावा लागला. त्याला लग्नासाठी 9 वर्षं वाट पहावी लागली.

मुंबई 4 जून: हिंदी चित्रपटसृष्टीत म्हणजे बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांच्या प्रेमकहाण्या, प्रेमप्रकरणं सतत चर्चिली जात असतात. दररोज नवनवी गॉसिप बाहेर येतात आणि त्यांवर अनेक मासिकं, वेबसाइट्स आणि वृत्तपत्रांचे कॉलम्स चालतात. अशी काही प्रकरणं आधीच्या काळात गाजली होती. सध्या थ्रोबॅकचा जमाना आहे. भूतकाळातील गोष्टी थ्रोबॅक म्हणून सादर होतात. (Sunil Shetty Love Story) तसंच हे एक भूतकाळातलं प्रेम प्रकरण. बॉलिवूडचा अण्णा म्हणजे सुनील शेट्टी (Sunil Shetty) याच्या प्रेमप्रकरणाबद्दल आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. आपल्या ॲक्शनसाठी सुरुवातीला प्रसिद्ध झालेल्या सुनील शेट्टीनी नंतर विनोदी चित्रपटांत भूमिका साकारल्या आणि आपला वेगळा ठसा उमटवला.

पण या यशस्वी अभिनेत्याला बॉलिवूडबरोबरच वैयक्तिक आयुष्यातही संघर्ष करावा लागला. त्याला लग्नासाठी 9 वर्षं वाट पहावी लागली. त्याचं झालं असं सध्याची सुनीलची बायको माना शेट्टी (suniel shetty wife) हिचं माहेरचं नाव मोनिशा कादरी. या दोघांची पहिली भेट मुंबईतल्या एका पेस्ट्री शॉपमध्ये झाली होती. पहिल्याच भेटीत सुनील मोनिशाच्या प्रेमात पडला. माध्यमांतील बातम्यांनुसार सुनीलला आपल्या मनातलं प्रेम मोनिशाला सांगायचं होतं पण त्यांची ओळख नव्हती. मग तयानी पहिल्यांदा मोनिशाच्या बहिणीशी मैत्री केली. हळूहळू त्याची मोनिशाशी मैत्री झाली आणि त्यांचे प्रेमसंबंध (Love) जुळले. पण एवढंच पुरेसं नव्हतं. त्यांच्या लग्नात मोठा अडसर होता धर्माचा. सुनील हिंदू तर मोनिशा मुसलमान. त्यामुळे दोघांच्या कुटुंबांनी या लग्नाला (Marriage) परवानगीच दिली नाही. मोठा प्रश्न उभा राहिला. हे दोघं तर प्रेमात पडले होते. आता काय करायचं हा त्यांच्यापुढचा प्रश्न होता.

प्रसिद्ध अभिनेत्रीचा मॉर्फ पॉर्न व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल; पोलीस घेतायेत निर्मात्याचा शोध

पण त्यांनी धीर धरला आणि 9 वर्षं वाट पाहिली. अखेर 25 डिसेंबर 1991 ला दोघांचं लग्न झालं. ही प्रेमकहाणी आता थोडीशी साधी वाटेल पण त्या काळात परधर्मातील जोडीदाराशी लग्न करणं हा खूपच मोठा प्रश्न होता. सगळ्या समाजाचं वैर पत्करून हे करायला लागायचं. पण सुनील-मोनिशाने ते केलं. आता मोनिशा बिझनेस वूमन आहे आणि त्या दोघांना अथिया (suniel shetty daughter) आणि अहान (suniel shetty Son) ही दोन मुलं आहेत. अथिया आणि अहान यांनी बॉलिवूडमध्ये काम करायचं ठरवलं आहे.

'आई-वडिलांनी हेच संस्कार दिले?' टॉपलेस फोटोमुळं ट्रोल करणाऱ्याला अभिनेत्रीनं शिकवला धडा

सुनील शेट्टी अजूनही विनोदी चित्रपटांत भूमिका साकारतो. पण त्यानी नव्वदच्या दशकात बरेच हिट सिनेमे दिले आहेत. त्याची बॉडी आणि ॲक्शनमुळे त्याच्यावर तरुणी मरायच्या. मोहरा, हेरा-फेरी, फिर हेरा-फेरी, बॉर्डर, गोपीकिशन यासारख्या हिट चित्रपटांत त्यानी काम केलं आहे.

First published:
top videos

    Tags: Bollywood actor, Entertainment, Sunil shetty