मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Aditi Dravid:'राहुल द्रविड खरंच तुझा काका आहे का?', अदिती द्रविडने अखेर सांगितलं सत्य

Aditi Dravid:'राहुल द्रविड खरंच तुझा काका आहे का?', अदिती द्रविडने अखेर सांगितलं सत्य

क्रिकेट आणि मनोरंजनसृष्टी यांचं फार जुनं आणि वेगळं नातं आहे, हे वारंवार सिद्ध झालं आहे. बॉलिवूडच नव्हे तर मराठी कलाकारांचासुद्धा या क्रिकेट जगताशी संबंध येत असतो. अभिनेत्री अदिती द्रविडचंसुद्धा असंच काहीसं आहे.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 20 जुलै- क्रिकेट आणि मनोरंजनसृष्टी यांचं फार जुनं आणि वेगळं नातं आहे, हे वारंवार सिद्ध झालं आहे. बॉलिवूडच नव्हे तर मराठी कलाकारांचासुद्धा या क्रिकेट जगताशी संबंध येत असतो. अभिनेत्री अदिती द्रविडचंसुद्धा असंच काहीसं आहे. देशाचा लोकप्रिय क्रिकेटर राहुल द्रविड आणि मराठी मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री अदिती द्रविड यांचं फार खास नातं आहे. अभिनेत्रीने स्वतः याचा खुलासा केला आहे.

'सुंदरा मनामध्ये भरली', 'माझ्या नवऱ्याची बायको' या तुफान गाजलेल्या मालिकांमधून अदिती द्रविडने प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. अदिती द्रविड सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपल्या नवनवीन पोस्टमधून चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते. ती आपले सुंदर-सुंदर फोटो आणि रील्स इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. तिच्या प्रत्येक पोस्टला चाहत्यांचा छान प्रतिसाद मिळत असतो. अभिनेत्री आपल्या एका नव्या पोस्टमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

नुकतंच अदिती द्रविडने आपल्या इन्स्टाग्रामवर चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी तिने इन्स्टाग्रामवर 'आस्क मी एनिथिंग' सेशन ठेवलं होतं. यामध्ये चाहत्यांनी तिला अनेक प्रश्न विचारले आणि अभिनेत्रीनेसुद्धा आपल्या गोड अंदाजात त्यांना उत्तरे दिली आहे. अभिनेत्रीला अनेकांनी तू खूप गोड आणि साधी आहेस म्हणत तिचं कौतुकदेखील केलं आहे. दरम्यान एका चाहत्याने तिला 'राहुल द्रविड आणि तुझ्यात खरंच कोणतं नातं आहे का? कि या फक्त अफवा आहेत. यावर उत्तर देत अभिनेत्रीने राहुल द्रविड यांच्यासोबतचा एक बालपणीचा फोटो शेअर करत लिहलंय, 'हे खरं आहे राहुल द्रविड हे माझे चुलत काका आहेत'. असं म्हणत अभिनेत्रीने यावर शिक्कामोर्तब केलंय.

(हे वाचा: Kushal Badrike B'day: 'कुणीतरी बॅगेत 50-60 रुपये टाकायची', वाचा कुशल बद्रिकेची इमोशनल लव्हस्टोरी)

आदिती सध्या 'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेत नंदिनीची भूमिका साकारताना दिसत आहे. या मालिकेतील तिच्या भूमिकेचं कौतुक होत आहे. यापूर्वी अदितीने झी मराठी वाहिनीवरील 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत शनायाची मैत्रीण म्हणजेच ईशाची भूमिका साकारली होती. तिचं आपल्या सहकलाकारांसोबत फार छान जमतं. त्यामुळेच रसिका सुनील आणि अक्षया नाईक तिच्या फार खास मैत्रिणी बनल्या आहेत.

First published:

Tags: Entertainment, Marathi actress, Marathi entertainment, Rahul dravid