मुंबई, 14 डिसेंबर - 'सुंदरा मनामध्ये भरली' (sundara manamadhe bharli ) ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील सर्वच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतायत. अभिमन्यू आणि लतिकाची जोडी सर्वांची आवडती जोडी आहे. मात्र या दोघांच्या प्रेमात आडवी येणारी मिस नाशिक म्हणजे कामिनी आता या मालिकेत दिसणार नाही. कामिनीची भूमिका जरी नकारात्मक असली तरी तिचा सोशल मीडियावर प्रचंड चाहता वर्ग आहे. आता कामिनीची भूमिका साकरणारी अभिनेत्री पूजा पुरंदरे (pooja purandare) हिने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात तिने चाहत्यांचे आभार मानत सोशल मिडीया पोस्ट केली आहे.
पूजा मालिकेतील सेटवरचे आणि सहकलाकारांसोबतचे खास क्षण शेअर करत म्हटले आहे की, "सुंदरा मनामध्ये भरली" या मालिकेतून मी निरोप घेतला आहे. "कामिनी " उर्फ "मिस.नाशिक" हे पात्र साकारताना खूप मजा आली. तुम्हा सर्वांकडून या पत्राला खूप प्रेम मिळालं. सुंदरा च्या सगळ्या टीम बरोबर हा प्रवास मस्त झाला. चॅनल, निर्मिती संस्था, लेखिका, दिग्दर्शक, सहकलाकार, टेक्निकल टीम अणि प्रेक्षक... सर्वांचे मनापासून आभार.. पुन्हा लवकरच भेटू..
वाचा : मराठी मालिकेत तेजश्री प्रधानचं कमबॅक! 'या' प्रसिद्ध मालिकेत झळकणार अभिनेत्री
पूजाने लिहिलेल्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी नाराजी दर्शवली आहे. आता यापुढे पूजा मालिकेत दिसणार नसल्याने तिचे चाहते नाराज झाले आहेत. पण पुन्हा लवकरच भेटू.. अशीही आशा तिने व्यक्त केली आहे. पूजा पुरंदरे हिच्या अगोदर मालिकेतील हेमाचे पात्र बदलण्यात आले होते. त्यावेळी देखील प्रेक्षक नाराज झाले होते. भूमिका जरी नकारात्मक असली तरी अभिनयाच्या जीवावर या अभिनेत्रींने वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे. आता कामिनीच्या जाण्याचा मालिकेवर काय परिणाम होणार किंवा तिची जागा कोण घेणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
View this post on Instagram
सुंदरा मनामध्ये भरली ह्या कलर्स मराठीवरील मालिकेत नुकतेच एक धक्कादायक वळण पाहायला मिळाले. अभिमन्यू आणि लतिका पुन्हा एकदा लग्न करून एकत्र आले आहेत. परंतु लग्नाहून परतत असताना त्यांना मोठा धक्का बसला आहे. या काळात दौलतने जहागिरदारांचे घर आणि जमिनीवर ताबा मिळवला. ही सर्व मालमत्ता पुन्हा मिळवण्यासाठी अभ्या आणि लतिका यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Marathi entertainment, TV serials, Zee marathi serial