मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'Sundara Manamadhe Bharli' मध्ये अगडबम लतिका अभ्यासाठी करणार वनजदार काम, पाहा Video

'Sundara Manamadhe Bharli' मध्ये अगडबम लतिका अभ्यासाठी करणार वनजदार काम, पाहा Video

 आता सुंदरा मनामध्ये भरली मालिकत लतिकाचे आयुष्य पूर्णपणे बदलणार आहे. मालिकेत अगडबम दिसणाऱी लतिका आता वनजदार काम करताना दिसणार आहे.

आता सुंदरा मनामध्ये भरली मालिकत लतिकाचे आयुष्य पूर्णपणे बदलणार आहे. मालिकेत अगडबम दिसणाऱी लतिका आता वनजदार काम करताना दिसणार आहे.

आता सुंदरा मनामध्ये भरली मालिकत लतिकाचे आयुष्य पूर्णपणे बदलणार आहे. मालिकेत अगडबम दिसणाऱी लतिका आता वनजदार काम करताना दिसणार आहे.

  • Published by:  News18 Trending Desk
मुंबई , 16 ऑक्टोबर : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका सुंदरा मनामध्ये भरली (sundara manamadhe bharli) ही मालिका सध्या एका नव्या वळणावर आहे. आता अवघा महाराष्ट्र ज्या गोष्टीची वाट बघत आहे ती गोष्ट मालिकेत घडणार आहे. अभिमन्यू आणि लतिकाच्या या प्रवासामध्ये (sundara manamadhe bharli latest update) अभिमन्यूचे हळूहळू मत बदलत गेले आणि आता प्रेक्षकांना दिलदार प्रेमाची वजनदार गोष्ट बघायला मिळते आहे. आता मालिकत लतिकाचे (akshaya naik) आयुष्य पूर्णपणे बदलणार आहे. मालिकेत (sundara manamadhe bharali latest episode )अगडबम दिसणाऱी लतिका आता वनजदार काम करताना दिसणार आहे. सध्या याचे काही फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यासोबतच याचा प्रोमो देखील समोर आला आहे. एका मुलाच्या ज्याप्रमाणे जोडीदाराबाबत अपेक्षा असतात त्याचप्रमआणे मुलीच्या देखील असूच शकतात. अभिमन्यूला त्याची जोडीदार फिट हवी होती पण काही गोष्टी घडल्या आणि अभिमन्यू - लतिका लग्नबंधनात अडकले. या प्रवासात अभिमन्यूचे लतिकाबाबतीतचे मत बदलायला हळूहळू सुरुवात झाली आणि तो तिच्या स्वभावाच्या प्रेमात पडला, लतिका जशी आहे तशी तिला त्याने स्वीकारले. कारण बाह्य सौंदर्यापेक्षा मनाचे सौंदर्य अधिक महत्त्वाचे असते हे त्याला उमगले. मग काय त्याच्या देखील सुंदरा मनामध्ये भरली. आता मालिकेत एक नवीन ट्वीस्ट पाहायला मिळणार. याचे काही फोटो व  व्हिडिओ देखील समोर आले आहेत.
ज्या समाजाने लतिकाल बेढब ठरवले, तिला हिणवले, तिला दूषण लावली, तिला नकार दिला त्यांना लतिका दमदार उत्तरं देणार आहे. आता “लतिका” देखील सौंदर्याच्या परिमाणात बसणारी मुलगी आहे हे ती पटवून देणार आहे. मालिकेत लवकरच शर्यत बघायला मिळणार आहे. लतिका बापूंच्या विरोधात जावून अभ्याच्या बाजूने मैत्रीण म्हणून नाही तर बायको म्हणून त्याची पहिल्यांदाच साथ देणार आहे. वाचा : 'Chala Hawa Yeu Dya' शोला या अभिनेत्याचा रामराम; दिसणार हिंदी कार्यक्रमात सगळ्यांना अभिमन्यू आता शर्यतीत हरला असं वाटतं असतानाच लतिका जोखड घेऊन शर्यतीमध्ये भाग घेणार आहे. हे जोखड म्हणजे लतिकासाठी एखादी वस्तु नसून तिच्या आयुष्यात जे काही न्यूनगंड होते, तिचे समज होते, या सगळ्या गोष्टींचा भार असलेली ती वस्तु म्हणजे जोखड. लतिका असं समजून या शर्यतीत लतिका भाग घेणार आहे. लतिका ही शर्यत कोणाविरुध्द, कोणासाठी लढणार नसून पहिले ती ही शर्यत स्वत:साठी लढणार आहे. ही शर्यत कशी रंगणार ? कोणत्या अडचणी लतिकासमोर येणार ? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनामध्ये असतील त्याची लवकरच उत्तरं मिळणार आहेत. मराठी टेलिव्हीजनवर पहिल्यांदाच अशाप्रकारची शर्यत रंगणार आहे. ही शर्यत पाहण्यासाठी प्रेक्षक देखील उत्सुक आहेत. वाचा : Bigg Boss Marathi 3 मुळे 'या' अभिनेत्रीला मोठा फटका ; हातातून गेला पहिला सिनेमा ही मालिका आता एक नव्या वळणावर आहे. त्यामुळे येणाऱ्या भागांमध्ये  अभिमन्यू आणि सर्वांची लाडकी लतिका यांच्या नात्यात प्रेम फुलणार का याची उत्सुकता लागली आहे.  पुन्हा या जोडीला एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक अतुर आहेत.
First published:

Tags: Colors marathi, Marathi entertainment, TV serials

पुढील बातम्या