• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • लतिकाच्या 'आज्जे'चा कधीही न पाहिलेला अंदाज, हा VIDEO होतोय VIRAL

लतिकाच्या 'आज्जे'चा कधीही न पाहिलेला अंदाज, हा VIDEO होतोय VIRAL

मालिकेमध्ये कधीही पाहिला न गेलेला आजीचा एक वेगळाच अंदाज अक्षयाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिसतो आहे.

 • Share this:
  मुंबई, 28 ऑगस्ट : कलर्स वाहिनीवरील प्रसिद्ध मालिका 'सुंदरा मनामध्ये भरली' (Sundara Manamadhe Bharli) एका वेगळ्याच वळणावर आली आहे. या मालिकेचा मोठा चाहता वर्ग असून मालिकेतील पात्रांनाही चाहत्यांची पसंती मिळते आहे. केवळ चेहऱ्याचीच सुंदरता नाही, तर मनाची सुंदरता अधिक महत्त्वाची असल्याचा मोलाचा संदेश या मालिकेतून दिला जात आहे. मालिकेतील प्रमुख भूमिकेत असलेली अभिनेत्री अक्षया नाईक (Akshaya Naik) या सेटवरील धमाल, मजा-मस्ती अनेकदा सोशल मीडियावर शेअर करत असते. सहकालाकारांसोबकचे अनेक फोटो, व्हिडीओही ती आपल्या सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करते. अक्षया नाईकने असाच एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर (Instagram) शेअर केला आहे. त्यात ती मालिकेतील तिच्या आईसोबत आणि बहिणीसोबत एका गाण्यावर काही स्टेप्स करताना दिसते.
  अक्षया आणि तिची मालिकेतील आई आणि बहिणी गाण्यावर ठेका धरत असतानाच मधूनच आजीची धमाल एन्ट्री होते. मालिकेमध्ये कधीही पाहिला न गेलेला आजीचा एक वेगळाच अंदाज अक्षयाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिसतो आहे. लतिकाच्या 'आज्जे'चा कधीही न पाहिलेला हा अंदाज, सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

  Shibani Dandekar नं या नाजूक भागावर गोंदवला टॅटू, लिहिलं बॉयफ्रेंडचं नाव

  स्वीटू - मोहितच्या लग्नावर संतापले प्रेक्षक; मालिका बंद करण्याची होतेय मागणी

  अक्षयानेही व्हिडीओ शेअर करत, या व्हिडीओतील शेवटचा खास भाग पाहण्याचं म्हटलं आहे. धम्माल गँग म्हणत तिने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
  Published by:Karishma
  First published: