मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Akshaya Naik : 7 ची शिफ्ट अन् नाशिकची थंडी; सेटवर लतिची लागली अशी वाट

Akshaya Naik : 7 ची शिफ्ट अन् नाशिकची थंडी; सेटवर लतिची लागली अशी वाट

अक्षया नाईक

अक्षया नाईक

नाशिकच्या थंडीत अभिनेत्री अक्षया नाईकचं कशी वाट लागली आहे हे सांगणारा एक व्हिडीओ तिनं शेअर केला आहे. अक्षयाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Minal Gurav

मुंबई, 24 नोव्हेंबर : राज्यात थंडीला सुरूवात झाली आहे. मुंबईसह संपूर्ण राज्यात सगळेच गुलाबी थंडीचा अनुभव घेत आहेत. गुलाबी थंडी वगैरे म्हणायला फार रोमँटिक वाट वाटतं पण ऐन थंडीत जेव्हा सकाळी 7 वाजता उठून कामाला जाव लागतं तेव्हा ती रोमँटिक वाटणारी थंडी नकोशी वाटू लागते. त्यातही जर तुम्ही नाशिकमध्ये असाल तर काही खरं नाही. असंच काहीस घडलंय प्रेक्षकांच्या लाडक्या लतीबरोबर. कलर्स मराठीवरील सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतील लती म्हणजे अभिनेत्री अक्षया नाईकची नाशिकच्या थंडीच चांगलीच वाट लागली आहे.  अक्षयानं सेटवरील एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात नाशिकच्या थंडीत काय अवस्था होतेय याची छोटी झलक दाखवली आहे.

महाराष्ट्रातील नाशिकमध्ये दरवर्षी प्रचंड थंडी असते. वातावरण 5-6 डिग्रीपर्यंत देखील पोहोचतं. अशा नाशिकमध्ये सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेच शुटींग सुरू आहे. अभिनेत्री अक्षया नाईक ही मुळची मुंबईची आहे. त्यामुळे नाशिकची थंडी तिच्यासाठी फारच नवीन आहे. नाशिकच्या हुडहुडी भरवणाऱ्या थंडीत जेव्हा अक्षयाची सकाळी 7 वाजताची शिफ्ट लागते तेव्हा तिची कशी अवस्था होते याचा एक मजेशीर व्हिडीओ तिनं शेअर केला आहे.

हेही वाचा - लग्नानंतरचा जागरण गोंधळ घालण्यासाठी अप्सरा पोहोचली थेट तुळजाभवानीच्या दारात; कुलदैवतेच्या दर्शनाचे फोटो आले समोर

अक्षयानं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती मेकअप रुममध्ये बसलेली आहे. अक्षया थंडीत कुडकुडत जॅकेट घालून बसली आहे. तिची मेकअप आर्टिस्टही कानटोपी, स्वेटर, मास घालून काम करत आहे. अक्षया शुटींगसाठी तयार होत असताना तिला प्रत्येक वेळी थंडी वाजत आहे. हेअर स्टाइल करायला गेल्यावरही अक्षया हात गार आहेत, असं म्हणत वेग वेगळे एक्सप्रेशन देताना दिसत आहे.  तर 'थंडी वाजतेय थंडी वाजतेय' म्हणत अक्षय मस्त जांभाळ्या देताना दिसतेय. मेकअप करतानाही ती 'क्रिम्स गार आहेत' असं म्हणताना दिसतेय. अक्षयाचा हा मजेशीर व्हिडीओ पाहून सर्वांनाच हसू येत आहे.  व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

'सकाळी सातची शिफ्ट असते आणि टेम्प्रेचरही सात ड्रिगी असते. हे नाशिक आहे सगळ्यांचं इथे स्वागत', असं म्हणत अक्षयानं हा मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे.  या क्यूट व्हिडीओ चाहत्यांनी पसंती दिली आहे. 'अक्षया अदिरापेक्षाही छोटी वाटतेय', असंही अनेकांनी म्हटलं आहे.  तर काहींनी 'कशी वाटली आमच्या नाशिकची थंडी' असे प्रश्न अक्षयानं विचारले आहेत.

First published:

Tags: Colors marathi, Marathi actress, Marathi entertainment, Marathi news