मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

‘सुंदरा मनामध्ये भरली’ हेमाच्या जागी दिसणारी ही नवी अभिनेत्री कोण ?

‘सुंदरा मनामध्ये भरली’ हेमाच्या जागी दिसणारी ही नवी अभिनेत्री कोण ?

'सुंदरा मनामध्ये भरली'  मालिकेतील हेमा जहागीरदार हे पात्र रंगवणाऱ्या अभिनेत्रीने म्हणजे प्रमिती प्रीतने मालिका सोडली आहे व तिच्याजागी एक दुसरी अभिनेत्री ही भूमिका साकारताना दिसत आहे. तर ही अभिनेत्री कोण आहे असा सर्वांना प्रश्न पडला आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 10 ऑक्टोबर: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'सुंदरा मनामध्ये भरली' ने ( sundara manamadhe bharali) प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेचा वेगळा असा प्रेक्षकवर्ग आहे. या मालिकेतील प्रत्येत पात्र प्रेक्षकांच्या आवडते आहे. सध्या मालिका एका नव्या वळणावर आहे. मालिकेतअभिमन्यू जहागीरदार आणि लतिका यांच्यात हळुवार खुलणारं प्रेम पाहायला प्रेक्षकांनाही आवडत असल्याचे दिसत आहे. मालिका रंगात आली असताना आता या मालिकेतील हेमा जहागीरदार हे पात्र रंगवणाऱ्या अभिनेत्रीने म्हणजे प्रमिती प्रीतने (pramitee preet )मालिका सोडल्याचं पाहायला मिळत आहे. तिच्याजागी एक दुसरी अभिनेत्री ही भूमिका साकारताना दिसत आहे. तर ही अभिनेत्री कोण  (sharvari pendharkar)आहे असा सर्वांना प्रश्न पडला आहे. आज आपण तिच्याविषयी जाणून घेणार आहे.

शर्वरी पेंढारकर कोण आहे ?

या अभिनेत्रीचे नाव शर्वरी पेंढारकर असे आहे. शर्वरी ही देखील अतिशय उत्कृष्ट अभिनेत्री आहे. तिने अनेक मालिका चित्रपटात काम केलेले आहे. शर्वरी “अजूनही बरसात आहे” या मालिकेत रिसेप्शनिस्ट म्हणून दिसत आहे. तिची ही भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली व तिच्या अभिनयाचे कौतुक झाले.

वाचा :'या' कारणासाठी अभिनेत्रीने अचानक सोडली 'सुंदरा मनामध्ये भरली' मालिका

शर्वरी ही मूळची नागपूरची

शर्वरी ही मूळची नागपूरची आहे. लाड कॉलेजमध्ये तिचे शिक्षण पूर्ण झाले. त्यानंतर तिने पुण्यातून ललित कला केंद्र येथून अभिनयाचे धडे गिरवले. त्यानंतर शर्वरीने अनेक एकांकिका, नाटकांमध्ये देखील काम केले. आता शर्वरी सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेमध्ये हेमा ही भूमिका साकारताना दिसत आहे. प्रेक्षक या नव्या हेमाल आपल करून घेणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

प्रमिती प्रीतने या कारणासाठी सोडली मालिका

प्रमिती प्रीतने पोस्ट करत म्हटलं आहे की, 'माझं आयुष्य काल वेगळं होतं आणि आज ते खूप वेगळं आहे. मी आता माझ्या जवळच्या प्रकल्पाचा भाग नाही सुंदरा मनामध्ये भरली. हे लिहिताना मला अश्रू अनावर झाले आहेत. पण शो पुढे गेलाच पाहिजे. मी त्यात असो किंवा नसो, माझं मन सुंदरासोबत नेहमीच असेल. सुंदरा मनामध्ये भरली सोबतचं हे वर्ष एक अद्भुत प्रवास आहे. मला त्यातील प्रत्येक सेकंदावर प्रेम होतं. सर्वांचे खूप आभार. मी आता माझ्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी थोडा वेळ घेईन. आपण हेमाला दिलेल्या सर्व प्रेमाबद्दल धन्यवाद. मी तुम्हा सर्वांवर प्रेम करते.', अशी काहीशी भावनिक पोस्ट प्रमितीने केली आहे. प्रेक्षक देखील प्रमितीला मिस करत आहेत. प्रमितीच्या चेहऱ्यावर इन्फेक्शन होत असल्याचं तिने सांगितलं आहे. मेकअप केल्यामुळे हे इन्फेक्शन होत होतं. डॉक्टरांनी देखील प्रमितीला मेकअप न करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे प्रमितीने काही काळ छोट्या पडद्यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे.

First published:

Tags: Colors marathi, Entertainment, Marathi actress, Marathi entertainment, TV serials