Home /News /entertainment /

'सापडला दिला टाकून...' सुंदरा मनामध्ये भरली अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

'सापडला दिला टाकून...' सुंदरा मनामध्ये भरली अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

सुंदरा मनामध्ये भरली फेम अभिनेत्याने नुकताच त्याचा एक फोटो पोस्ट केला आहे. मात्र त्याच्या फोटोपेक्षा त्याच्या कॅप्शनची जोरदार चर्चा रंगली आहे.

  मुंबई, 10 मे- कर्लस मराठीवरील (colors marathi ) सुंदरा मनामध्ये भरली (Sundara manamadhe Bharali ) ही मालिका छोट्या पडद्यावरली लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील अभ्या आणि लतिकाची जोडी प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. अभ्याची (Abhimanyu) भूमिका मालिकेत अभिनेता समीर परांजपे (sameer paranjape) साकारताना दिसतो. तर लतिकाची भूमिका अक्षया नाईक साकारताना दिसतो. समीर सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. नुकतीच त्याने एक पोस्ट केली आहे ज्यामुळे तो चर्चेत आला आहे. समीर परांजपेने नुकताच त्याचा कुर्तीमधील एक फोटो पोस्ट केला आहे. शिवाय या फोटोला त्यानं एक कॅप्शन देखील दिली आहे. सध्या त्याच्या या फोटोपेक्षा कॅप्शनचीच चर्चा रंगलेली आहे. त्यानं कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, खिडकीच्या कडाप्प्याला धरून पेंगत उभा होतो तेव्हां उमटलेली एक निरागस भोळी भावमुद्रा Throwback Thursday पर्यंत कोण थांबेल. #सापडलादिलाटाकून.. सध्या त्याच्या या लुकचं तर कौतुक होत आहेच पण कॅप्शनचं देखील तितकीच चर्चा रंगलेली आहे. वाचा-'जीव झाला येडापिसा'मधून लोकप्रिय झाली होती सिद्धी, पाहा सध्या कुठे आहे अभिनेत्री समीर परांजपे याचा जन्म मुंबईत झाला आणि त्याने शिक्षण देखील मुंबईत पूर्ण केलेले आहे. महाविद्यालयात असताना फिरोदिया करंडक यामध्ये त्याने सहभाग नोंदवला होता आणि ही स्पर्धा देखील जिंकली होती. 2016 मध्ये समीर परांजपे याने लग्न केलेले आहे. त्याच्या पत्नीचे नाव अनुजा असे आहे. ती देखील आयटी इंजिनियर आहे. आणि ती पुण्यात नोकरी करते. समीर देखील पुण्यातच राहतो. मात्र कामानिमित्त मुंबईला येणे जाणे असते. समीर याने सगळ्यात आधी माझे पती सौभाग्यवती या मालिकेतून पदार्पण केले होते.
  स्टार प्रवाह या वाहिनीवरील गोठ या मालिकेत त्याला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. त्यानंतर तो गर्जा महाराष्ट्र या मध्ये देखील दिसला होता. याच बरोबर अग्निहोत्र 2 या मालिकेतही त्याने काम केले आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment

  पुढील बातम्या