'सुंदरा मनामध्ये भरली' मधील अभ्याच्या लेकीचा क्यूटवाला PHOTO पाहिला का?
'सुंदरा मनामध्ये भरली' मधील अभ्याच्या लेकीचा क्यूटवाला PHOTO पाहिला का?
कर्लस मराठीवरील (colors marathi ) सुंदरा मनामध्ये भरली (Sundara manamadhe Bharali ) मालिकेत अभ्याची भूमिका साकारणारा समीर परांजपे काही दिवसापूर्वी बाबा झाला आहे. त्याच्या लेकीचा क्यूटवाला फोटो समोर आला आहे.
मुंबई, 22 जानेवारी- कर्लस मराठीवरील (colors marathi ) सुंदरा मनामध्ये भरली (Sundara manamadhe Bharali ) ही मालिका छोट्या पडद्यावरली लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील अभ्या आणि लतिकाची जोडी प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. अभ्याची ( Abhimanyu) भूमिका मालिकेत अभिनेता समीर परांजपे (sameer paranjape) साकारताना दिसतो. तर लतिकाची भूमिका अक्षया नाईक साकारताना दिसतो. अभ्याची पडद्यावर जितकी लतिकासोबत केमिस्ट्री चांगली आहे. तितकीच स्ट्रॉंग केमिस्ट्रि त्याची रिअल लाईफ पत्नीसोबत देखील. त्याच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये हे देखील दिसते. समीरने नुकताच त्याच्या (sameer paranjape daughter Photo) लेकीचा क्यूट फोटो शेअर केला आहे.
अभिनेता समीर परांजपे विवाहित आहे. समीरच्या पत्नीचं नाव अनुजा परांजपे आहे. समीर नेहमी पत्नी अनुजासोबत फोटो शेअर करत असतो. आता त्याने लेकिसोबतचा फोटो शेअर केला आहे. शिवाय त्याने #fatherdaughter असं देखील लिहिलं आहे. यापूर्वी देखील समीरचे लेकीसोबतचे काही फोटो व्हायरल झाले होते मात्र त्यामध्ये तिचा चेहरा दिसला नव्हता. या फोटोत मात्र समीरच्या लेकीचा चेहरा दिसत आहे. अनेकांना या फोटोवर कमेंट करत म्हटलं आहे की, क्यूटनेस ओव्हरलोड तर काहींनी हार्ट इमोजी पोस्ट करत प्रेम व्यक्त केलं आहे.
अभिनेता समीर परांजपे नुकताच बाबा झाला आहे. ही गुड न्यूज समीरने सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली होती. आता त्याने लेकिचा क्युटवाला फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे. समीर व त्याची पत्नी अनुजा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. अनुजा लेकिसोबतचे फोटो शेअर करत असते. मात्र तिचा चेहरा आतापर्यंत दाखवला नव्हता. समीर आज फोटो शेअर करत लेकीचा गोड चेहरा दाखवला आहे. त्याच्या या पोस्टवर पत्नी अनुजाने देखील हार्ट इमोजी पोस्ट केली आहे.
वाचा-'....जग जिंकल्याचा आनंद होतोय', 'पांडू'च्या यशानंतर म्हादूची खास पोस्ट
समीरने अनुजाशी 2016 मध्ये लग्न केले आहे. लग्नापूर्वी हे दोघं एकमेकांचे चांगले मित्र होते.अनुजा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. अनुजा पुण्यात एका खासगी कंपनीत नोकरी करत आहे. तरी समीर सध्या सुंदरा मनामध्ये भरली मालिकेत अभ्याच्या मुख्य भूमिकेत दिसत आहे.
Published by:News18 Trending Desk
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.