मुंबई, 27 जून : अभिनेता हृतिक रोशनची बहीण सुनैना रोशन काश्मिरी पत्रकार रूहैल अमीनसोबतच्या नात्यामुळे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. अभिनेत्री कंगना रणौतची बहीण रंगोली चंडेलनं याविषयी सुरुवातीला ट्वीट केलं होतं आणि त्यानंतर कुटुंबीयांनी या नात्यामुळे खूप त्रास दिल्याचा आरोप सुनैनानं केला होता. रूहैल एक मुस्लीम व्यक्ती असल्यानं माझे कुटुंबीय त्याला स्वीकारायला तयार नाहीत असंही तिनं सांगितलं. त्यानंतर या सर्व प्रकरणावर रूहैलनंही प्रतिक्रिया दिली होती.
इम्रान खानची बायको डिप्रेशनमध्ये, ट्रिटमेन्टसाठी दररोज जातेय वेलनेस सेंटरमध्ये
मिडिया रिपोर्टनुसार रोशन कुटुंबीयांच्या एक जवळच्या व्यक्तीनं सुनैनाला रोशन कुटुंबीयांनी विरोध करण्यामागचं खरं कारण स्पष्ट केलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार रुहैल आमीन विवाहीत असून त्याची मुलंही आहेत. त्यामुळे राकेश आणि पिंकी रोशन तसेच हृतिक या नात्याच्या विरोधात आहेत. सुनैनानं याआधीच्या तिच्या वैवाहिक आयुष्यात चुका केल्या आहेत त्यामुळे तिनं आता आणखी चुका करू नये असं रोशन कुटुंबीयांना वाटतं.
...तर मलायका अरोरा आणि अरबाज खान पुन्हा येणार एकत्र?
Loading...
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वी न्यूज 18 सोबत बोलताना रूहैल यांनी स्पष्ट शब्दात आपले विचार मांडले होते. ते म्हणाले, या घटनेनं पुन्हा एकदा आजच्या काळात जुनाट विचार संपले आहेत असं म्हणणाऱ्यासाठी ते आजही तसेच असल्याचं सिद्ध केलं आहे. लव्ह जिहादच्या दृष्टीकोनावर रुहैल म्हणाले, ‘हे खूप दुर्भाग्यपूर्ण आहे. कोणालाही त्याच्या धर्मावरून बोलणे हे खरं तर अपमानकारक आहे आणि यावर सर्वांनीच आवाज उठवायला हवा.’ यासोबतच आपण सुनैनाला एका कंपनीसाठी एंटरटेनमेंट कव्हर करतेवेळी भेटलो होतो हे सुद्धा कबूल केलं. त्यानंतर काही काळ आमच्यातील संपर्क पूर्णपणे तुटला होता मात्र आम्ही पुन्हा एकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून भेटलो असं रुहैल यांनी सांगितलं.
सनीने केला गौप्यस्फोट, सांगितलं का सोडली पॉर्न इंडस्ट्री
याशिवाय राकेश रोशन यांच्या रुहैलला दहशतवादी संबोधण्याविषयी बोलताना रुहैल यांनी, ‘एखाद्याला त्याच्या धर्मावरून बोलणं किंवा त्याला आतंकवादी म्हणणं मला अजिबात मान्य नाही. धर्म ही तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या समाजात बोलायची गोष्ट नाही. या गोष्टीवर खरं तर आपण दुर्लक्ष करायला नको. सुनैना तिचं आयुष्य नव्यानं सुरू करू इच्छिते आणि यात तिला तिच्या कुटुंबाने पाठींबा द्यावा अशी तिची अपेक्षा आहे.’ असं मत मांडलं होतं.
===========================================================
करोडपतीच्या सेटवर सयाजी शिंदेंनी केला सरप्राईज संदर्भातला खुलासा
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा