मुंबई, 29 मार्च- छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय शो म्हणून 'द कपिल शर्मा शो'
(The Kapil Sharma Show) ला ओळखलं जातं. गेल्या काही दिवसांपासून हा शो प्रचंड चर्चेत आहे. सुरुवातीला 'द काश्मीर फाईल्स' या चित्रपटाचं प्रमोशन नाकारल्याचं आरोप लावण्यात आल्याने हा शो चर्चेत आला होता. त्यांनतर हा शो बंद होणार अशा चर्चा सुरु झाल्या होत्या. दरम्यान आता या शोमधील लोकप्रिय व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती
(Sumona Chakrborty) हा शो सोडणार असल्याचं म्हटलं जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून 'द कपिल शर्मा शो'बाबत वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या येत आहेत. दरम्यान अनेक अफवांवरसुद्धा ब्रेक लावण्यात आला आहे. मात्र आता शोची लोकप्रिय व्यक्तिरेखा असणारी सुमोना चक्रवर्ती कपिल शर्मा शो सोडणार असल्याचं मानलं जात आहे. त्याचं कारणसुद्धा खास आहे. वास्तविक 'द कपिल शर्मा शो'मध्ये आपल्या मजेशीर हावभावने लोकांना हसवणारी सुमोना तिच्या नवीन प्रोजेक्टवर काम करत आहे. ती एका बंगाली शोमध्ये दिसणार आहे, ज्याचा प्रोमोही नुकतंच समोर आला आहे.
सुमोना चक्रवर्तीच्या नवीन शोचा प्रोमो Zee zest च्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. तिच्या आगामी शोचे नाव 'शोनार बंगाल' आहे. जो झी झेस्टवर 30 मार्चपासून रात्री 8 वाजता प्रसारित होणार आहे. या शोमध्ये सुमोना बंगालचे सौंदर्य एक्सप्लोर करताना दिसणार आहे. ती प्रेक्षकांना बंगालचे साहित्य, कला, संगीत आणि बंगालमधील विविध ठिकाणांची झलक दाखवणार आहे. प्रोमो पाहून कळते की सुमोना तिच्या नवीन शोचा खूप आनंद घेत आहे.ती फारच उत्साही दिसत आहे.
सध्या या शोचा प्रोमो पाहून प्रेक्षक सुमोना 'द कपिल शर्मा शो' सोडणार का? असा प्रश्न विचारत आहेत. परंतु अद्याप सुमोना किंवा कपिल शर्माकडून कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही. तथापि, दोन वेगवेगळ्या शोमध्ये व्यस्त राहणं एखाद्या कलाकारासाठी कठीण आहे हे नक्की. कारण हे दोन्ही शो वेगवेगळ्या राज्यात शूट केले जात आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.