कल्पक दिग्दर्शकांच्या मागे निर्मात्यांनी उभं राहावं -सुमित्रा भावे

12 जून ते 15 जून दरम्यान सिटी प्राईड कोथरुड येथे 'सुवर्णपंचमी' या चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या महोत्सवात 'श्यामची आई', 'श्वास', 'देऊळ', 'कोर्ट' आणि 'कासव' या चित्रपटांचा रसिकांनी आस्वाद घेतला.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jun 15, 2017 08:28 PM IST

कल्पक दिग्दर्शकांच्या मागे निर्मात्यांनी उभं राहावं -सुमित्रा भावे

15 जून : कलाकाराच्या मनातील कोणतीही कलाकृती वास्तवात येण्यासाठी अार्थिक पाठबळ त्यास हवं असतं. चित्रपट हे देखील असंच माध्यम आहे दिग्दर्शकास निर्मात्याकडून पुरेसं स्वातंत्र्य मिळाल्यास तो चांगल्या कलाकृती निर्माण करु शकतो. कासव चित्रपटाचे निर्माते डाॅ. प्रकाश लोथे यांनी दिग्दर्शिका म्हणून मला दिलेल्या स्वातंत्र्य आणि माझ्यावर दाखविलेल्या विश्वासामुळेच मी कासव चित्रपटाची निर्मिती करु शकल्याची भावना ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांनी व्यक्त केली.

संवाद पुणे, कोहीनुर ग्रुप,अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, कला सांस्कृतिक परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने सुवर्णकमळ विजेत्या चित्रपटांचा गाैरव करण्यासाठी आयोजित सुवर्णपंचमी' चित्रपट महोत्सावाची सांगता  आज  'कासव'  या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटाने झाली. त्यावेळी 'कासव' चित्रपटाच्या दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांना कोहीनूर ग्रुपचे प्रमुख कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं. त्यावेळी सुमित्रा भावे बोलत होत्या.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन कोथरुड सिटी प्राईडेचे प्रमुख प्रकाश चाफळकर, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले,निकिता मोघे, संवाद पुणेचे सुनील महाजन, रामदास फुटाणे कासव चित्रपटातील कलाकार आलोक राजवाडे, इतर सहकलाकार  तंत्रज्ञ आदी मान्यवर उपस्थित होते.

12 जून ते 15 जून दरम्यान सिटी प्राईड कोथरुड येथे 'सुवर्णपंचमी' या चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या महोत्सवात 'श्यामची आई', 'श्वास',  'देऊळ', 'कोर्ट' आणि 'कासव' या चित्रपटांचा रसिकांनी आस्वाद घेतला.

याप्रसंगी कासव चित्रपटातील कलाकार आलोक राजवाडे तसेच आदी सहकलाकार यांच्यासह चित्रपट निर्मिती प्रक्रियेतील तंत्रज्ञान यांचा देखील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 15, 2017 08:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...