मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Sumeet Raghavan: 'हिंदी चित्रपटांसाठी आमचा बळी'; बॉलिवूडवर का भडकला मराठमोळा सुमित राघवन?

Sumeet Raghavan: 'हिंदी चित्रपटांसाठी आमचा बळी'; बॉलिवूडवर का भडकला मराठमोळा सुमित राघवन?

आमिर खानच्या लाल सिंह चड्ढा सिनेमाला प्रेक्षकांनी केलेल्या विरोधामुळे सिनेसृष्टी चांगलीच ढवळून निघाली आहे.  याचा परिणाम मराठी सिनेमांवरही होताना दिसतोय. अभिनेता सुमित राघवननं यावर संताप व्यक्त केला आहे.

आमिर खानच्या लाल सिंह चड्ढा सिनेमाला प्रेक्षकांनी केलेल्या विरोधामुळे सिनेसृष्टी चांगलीच ढवळून निघाली आहे. याचा परिणाम मराठी सिनेमांवरही होताना दिसतोय. अभिनेता सुमित राघवननं यावर संताप व्यक्त केला आहे.

आमिर खानच्या लाल सिंह चड्ढा सिनेमाला प्रेक्षकांनी केलेल्या विरोधामुळे सिनेसृष्टी चांगलीच ढवळून निघाली आहे. याचा परिणाम मराठी सिनेमांवरही होताना दिसतोय. अभिनेता सुमित राघवननं यावर संताप व्यक्त केला आहे.

  • Published by:  Minal Gurav
मुंबई, 13 ऑगस्ट:  मराठमोळा अभिनेता सुमित राघवन, उर्मिला कोठारे, पुष्कर श्रोत्री, अर्जुन पूर्णपत्रे, मोहन आगाशे यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'एकदा काय झालं' हा सिनेमा 5 ऑगस्टला महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे.  आयुष्यात नाती घट्ट करण्याच्या दृष्टीनं आयुष्यात आजी आजोबा आणि इतर नातेवाईकांचं किती महत्त्वाचं स्थान आहे हे अधोरेखित करणारा हा सिनेमा आहे. उत्तम कथा असलेला हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मात्र पाठव फिरवली आहे.  मराठी सिनेमांना आधीपासूनच कमी स्क्रिनिंगचा सामना करावा लागतो त्यात सध्या आमिर खानच्या लाल सिंह चड्ढा सिनेमाला प्रेक्षकांनी केलेल्या विरोधामुळे सिनेसृष्टी चांगलीच ढवळून निघाली आहे. सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकच थिएटरमध्ये पोहोचले नाही तर मराठी सिनेमा कसा चालणार असा प्रश्न उभा राहतो. या सगळ्यावर अभिनेता सुमित राघवन यानं 'हिंदी चित्रपटांसाठी आमचा बळी का' असा संतप्त सवाल केला आहे. एकदा काय झालं हा सिनेमा 5 ऑगस्टला प्रदर्शित झाला आहे. सिनेमा प्रदर्शित झालेल्या आठवड्यात त्याला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही तर सिनेमाचे शो कमी होऊन सिनेमा काढून टाकला जातो. एकदा काय झालं सिनेमा प्रदर्शित होऊन एक आठवडा झाला मात्र महाराष्ट्र सोडा एकट्या मुंबईत सिनेमाचे फक्त 3 शो लावण्यात आले आहेत.  या सगळ्यावर सुमित राघवन चांगलाच भडकला आहे. त्यानं ट्विट करत आपली खंत मांडली आहे. हेही वाचा - Hruta Durgule: हृताला अजिबात करायला आवडत नाही 'ही' गोष्ट; अभिनेत्रीनं सांगितलं आपलं सिक्रेट सुमितनं म्हटलंय, 'काल आमच्या चित्रपटावरच्या एका पोस्ट मध्ये एक वाक्य लिहिलं होतं की "जिथे पिकतं तिथे विकत नाही". आज एक आठवडा झाला एकदा काय झालं प्रदर्शित होऊन आणि मुंबईत जेमतेम ३ शो आहेत. एक ठाण्याला आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी एकही शो नाहीये. हिंदी चित्रपटांसाठी आमचा बळी जाताना दिसतोय. कारण काय तर बुकिंग होत नाही. ज्यांना मराठी बद्दल आस्था आहे,ते वाट बघतात आमचा चित्रपट टीव्ही वर किंवा ओटीटीवर येण्याची. जे राजकीय पक्ष आहेत,अशा वेळेला त्यांना मराठीला सावत्र वागणूक दिल्याबद्दल आक्षेप नाहीये'. सुमितनं पुढे म्हटलंय, 'फेसबुक/ट्विटर/इंस्टा सगळीकडे कौतुकाचा वर्षाव होतोय. ऐतिहासिक,सामाजिक,राजकीय चित्रपटांच्या गर्दीत एका सर्व सामान्य कुटुंबाची गोष्ट आहे ज्या मध्ये, बघणाऱ्या प्रत्येकाला स्वतःचं काहीतरी मिळतंय,काहीतरी खोल आत ढवळलं जातंय. पुन्हा एकदा नाती घट्ट करण्याच्या दृष्टीने, कुटुंबाचं महत्त्व पुन्हा दृढ करण्याच्या दृष्टीने,आजी आजोबांचं स्थान किती महत्त्वाचं आहे,मनं जपणं किती गरजेचं आहे अशा एक ना अनेक गोष्टी सांगणारा हा चित्रपट आहे'. सुमितनं सिनेमा पाहण्यासाठी आवाहन केलं आहे. त्यानं म्हटलंय, ' कृपा करून घराबाहेर पडा आणि आमचा चित्रपट बघा. हिंदी बद्दल आक्षेप नाही पण विनंती आहे की किमान दोन आठवडे तरी द्या आम्हाला. एकतर तिकीट १००/- ,त्यात shows नाहीत. कसं होणार सांगा? एक उत्तम चित्रपट लुप्त होऊ देऊ नका. प्रेक्षक आणि सर्व पक्ष,सगळ्यांना कळकळीची विनंती आहे. चित्रपट बघा आणि तुम्ही ठरवा'. इतकंच नाही तर एकदा काय झालं हा सिनेमा पाहण्यासाठी गेलेल्या 93 वर्षांच्या आजोबांचा व्हिडीओ देखी शेअर केलाय. त्यानं म्हटलंय,  '९३ व्या वर्षी जर आमचे काका चित्रपटगृहात जाऊन आमची फिल्म बघू शकतात तर मग "अरे ओटीटवर आल्यावर बघू किंवा टीव्ही वर बघू" असा विचार नका करू. तुम्ही जर थिएटर मध्ये नाही आलात तर आमचे शो कमी होतील आणि हा पिक्चर सर्वांपर्यंत नाही पोहोचणार'.
First published:

Tags: Marathi cinema, Marathi entertainment

पुढील बातम्या