मुंबई, 24 जून- सध्या मराठी मालिकांमध्ये (Marathi Serial) वटपौर्णीमेचं वातावरण आहे. मालिकेतील प्रत्येक अभिनेत्री आपल्याला सात जन्म हाच नवरा मिळावा यासाठी वडाची पूजा करत आहेत. उपवास धरत आहेत. मराठीतील लोकप्रिय मालिका ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ (Sukha Mhanje Nakki Kay Asat) मध्येसुद्धा गौरी (Gauri) आणि जयदीपची (Jaydeep) वटपौर्णिमा अगदी उत्साहात पार पडली. वटपौर्णीमेनंतर हे दोघेही देवीच्या दर्शनासाठी निघाले आहेत. मात्र अनिलच्या घातपातामुळे हे संकट गौरी आणि जयदीपच्या जीवावर बेतणार असल्याचं दिसत आहे.
View this post on Instagram
स्टार प्रवाहवर ‘सुख म्हणजे नक्की काय असत’ मालिका चाहत्यांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेला मोठी पसंतीदेखील मिळत आहे. मालिकेत गौरी आणि जयदीपची केमिस्ट्री दर्शकांना खुपचं भावते. मालिकेत गौरी आणि जयदीपमध्ये जवळीक वाढत आहे. इतकचं नव्हे तर गौरीला आपलं जयदीपवर प्रेम असल्याची जाणीव देखील झाली आहे. आत्ता ती जयदीपला या प्रेमाची कबूली कशी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. तोपर्यंत मालिकेत वटपौर्णीमेचा उत्साहदेखील दिसून आला. घरातील इतर स्त्रियांप्रमाणे गौरीनेदेखील मोठ्या उत्साहाने वटपौर्णिमा साजरी केली आहे.
(हे वाचा: राजा राणीची ऑन ड्युटी वटपौर्णिमा, लतिका-आभ्याचा दुरावा मिटणार? पाहा वटपौर्णिमेला )
यांनतर नुकताच मालिकेचा एक नवा प्रोमो रिलीज झाला आहे. हा प्रोमो पाहून चाहत्यांदेखील चिंता वाटू लागली आहे. नवीन प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं आहे, जयदीप आणि गौरी देवीच्या दर्शनासाठी जायला निघाले आहेत. मात्र त्यांच्या कारचे ब्रेक फेल आहेत. आणि हे सर्व अनिलने केलं आहे. अनिलने पुन्हा एकदा गौरी आणि जयदीपच्या आयुष्यात वादळ निर्माण केलं आहे. ब्रेक्स फेल झाल्यामुळे या दोघांच्या कारचा अपघात होण्याची चिन्हे दिसत आहेत. आणि म्हणूनचं चाहत्यांना चिंता वाटत आह. अनिलचा हा डाव पूर्ण होणार का जयदीप आणि गौरीच्या जीवाचं काही बरं वाईट होणार का? याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi entertainment