मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Sukh Mhanje Nakki Kay Asta: गौरीसाठी धावून आली साक्षात अंबाबाई; दसऱ्यादिवशी दोघांच्या आयुष्यात येणार सुखाचे क्षण

Sukh Mhanje Nakki Kay Asta: गौरीसाठी धावून आली साक्षात अंबाबाई; दसऱ्यादिवशी दोघांच्या आयुष्यात येणार सुखाचे क्षण

सुख म्हणजे नक्की काय असतं

सुख म्हणजे नक्की काय असतं

अपघातामुळे गौरी आणि तिच्या बाळाच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्या दोघांचाही जीव वाचावा यासाठी जयदीप जीवाचं रान करत आहे. अखेर त्याच्या प्रयत्नांना यश आलं आहे. काय घडणार मालिकेत आगामी भागात जाणून घ्या.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Nishigandha Kshirsagar

मुंबई, 2 ऑक्टोबर : 'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका अतिशय रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. एकीकडे गौरी-जयदीप आई बाबा होणार याचा आनंद साजरा एकमेकींच्या साक्षीनं साजरा करत असतानाच त्यांच्या सुखाला कुणाची तरी नजर लागते. कारण गौरीचा जीवघेणा अपघात होतो. या अपघातामुळे गौरी आणि तिच्या बाळाच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्या दोघांचाही जीव वाचावा यासाठी जयदीप जीवाचं रान करत आहे. अखेर त्याच्या प्रयत्नांना यश आलं आहे. गौरीने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे.

स्टार प्रवाहवरून प्रसारित होणाऱ्या सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत गौरीचा आणि होणाऱ्या बाळाचा जीव वाचावा यासाठी जयदीपने कोल्हापुरच्या अंबाबाईला साकडं घातलं होतं. लोटांगण घालत त्याने देवीचं दर्शन घेतलं होतं. यासोबतच जयदीपनं मंदिराची साफसफाई करुन दिव्यांची आरासही केली होती. मंदिरात येणाऱ्या भाविकांचे पादत्राणेही सांभाळण्याचं काम जयदीपनं केलं होतं. सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या नवरात्री विशेष भागांत हे रोमांचक प्रसंग पाहायला मिळाले होते. होते. जयदीपने गौरी आणि बाळाचा जीव वाचावा म्हणून  मनापासून अंबाबाईची प्रार्थना केली होती. अखेर अंबाबाईच त्याच्या मदतीला धावून आली.

हेही वाचा - Tu chal pudha : नवरा बायकोच्या नात्यातील अहंकाररुपी रावण जाळू शकेल का अश्विनी?; एपिसोड अपडेट पाहा

मालिकेच्या दसरा विशेष भागाचा प्रोमो समोर आला आहे. मराठी एंटरटेनमेंट या पेजने  हा व्हिडीओ टाकला आहे. त्यामध्ये गौरीने आपल्या बाजूने सगळे प्रयत्न करून झाल्यावर गौरीचा जीव वाचवण्यासाठी अंबाबाईचा धाव केला होता. आता साक्षात अंबाबाईचा त्याच्या मदतीला धावून आली. मालिकेच्या प्रोमोमध्ये अंबाबाई डॉक्टर म्हणून आली आहे आणि गौरीचा आणि तिच्या बाळाचा जीव वाचवला आहे. गौरीने एका गोड मुलीला जन्म दिला आहे. ती डॉक्टर 'तुमच्या घरी लक्ष्मी' आलीये' असं म्हणत बाळाला जयदीपकडे देते. पण जयदीप तिला ओळखतो. ती साक्षात देवीचं असल्याची त्याची खात्री पटते.  अभिनेत्री निशा परुळेकर हिने देवीची भूमिका साकारली आहे. मालिकेचा हा भाग दसऱ्यादिवशी म्हणजेज ५ ऑक्टोबरला पाहायला मिळणार आहे.

'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत आता इथूनपुढे गौरी आणि जयदीपचं सुखी संसार पाहायला मिळणार आहे. गौरी आणि जयदिपवर आजपर्यंत अनेक संकटं आली. पण त्यावर या दोघांनी मिळून मात केली. आता इथूनपुढे मालिकेत चांगला ट्रॅक  पाहायला मिळेल अशी प्रेक्षकांना आशा आहे. सुख म्हणजे काय असतं  मालिकेत आलेल्या नव्या ट्विस्टमुळे मालिका टीआरपी मध्ये पाच मध्ये आहे.  या मालिकेचे प्रचंड मोठ्या प्रमाणात चाहते आहेत.  आता येणाऱ्या काळात मालिकेत जयदीप आणि गौरी बाळाला कसं वाढवणार ते बघण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

जयदीप ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेता मंदार जाधवनं नवरात्री विशेष भागासाठी विशेष मेहनत घेतली होती. कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन त्यानं याआधीही घेतलं होतं. मात्र या पवित्र वास्तूत आपल्या मालिकेचं चित्रीकरण व्हावं ही त्याची इच्छा होती. देवीच्या आशीर्वादानं मंदारची ही इच्छा पूर्ण झाली. शूटिंगच्या निमित्तानं का होईना देवीची सेवा करायला मिळाली ही माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय घटना आहे, अशी भावना मंदारनं यावेळी व्यक्त केली.

First published:

Tags: Marathi actress, Marathi entertainment