Home /News /entertainment /

सुख म्हणजे नक्की काय असतं : अंबाबाईनं दिला गौरीला कौल ; यामुळे तिच्या आयुष्यात येणार मोठ वादळ

सुख म्हणजे नक्की काय असतं : अंबाबाईनं दिला गौरीला कौल ; यामुळे तिच्या आयुष्यात येणार मोठ वादळ

sukh mhanje nakki kay asta new twist : सध्या मालिकेत जयदीप- गौरीचा हनिमून ट्रॅक सुरू आहे. मात्र आता मालिकेत एक नवा ट्विस्ट येणार आहे ज्यामुळे गौरीच्या आयुष्यात मोठ वादळ निर्माण होणार आहे.

  मुंबई, 23 जानेवारी- स्टार प्रवाह वाहिनीवरील सुख म्हणजे नक्की काय असतं  (sukh mhanje nakki kay asta )  ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. विशेषकरून या मालिकेतील जयदीप आणि गौरीची जोडी सर्वांच्या आवडती आहे. आता या दोघांनी पुन्हा एकदा थाटात लग्नगाठ बांधली आहे. लग्नानंतर ही जोडी आता हनिमूनला गेली आहे. सध्या मालिकेत या दोघांचा हनिमून ट्रॅक सुरू आहे. गौरी आणि जयदीप यांची रोमॅंटिक डेटवर डेट सुरू आहे. सगळीकडे कसं प्रेमाचे वारं वाहत आहे. मात्र आता मालिकेत एक नवा ट्विस्ट (sukh mhanje nakki kay asta new twist)  येणार आहे ज्यामुळे गौरीचे तर आय़ुष्या बदलणारच आहे. याचा परिणार शिर्के -पाटील कुटुंबावर देखील होणार आहे. एका पोर्टलने दिलेल्या माहितीनुसार, अंबाबाईने गौरीला ती कधीच आई होणार नाही असा कौल दिला आहे. हा कौल खरा ठरला तर मालिकेत पुढे काय होणार असा देखील प्रेक्षकांना प्रश्न पडला आहे. त्यामुळे मालिकेत लवकरच नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार हे नक्की झाले आहे. वाचा-शुभमंगल सावधान! अखेर रोहित -जुईलीच्या डोई पडल्या अक्षता शिवाय काही दिवसापूर्वी मायी आणि दादा यांनी जयदीपजवळ त्यांच्या मनातील इच्छा बोलून दाखवली आहे. या वयात, म्हातारपणात त्यांना रक्ताचं व हक्काचे खेळणं पाहिजे ज्याच्याकडे पाहून त्या जगतील. त्यामुळे जेव्हा मायी व दादा यांना गौरीचे हे सत्य समजेल तेव्हा त्यांची कशी प्रतिक्रिया असणार हे देखील पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. शिवाय याचा शिर्के- पाटील कुटुंबावर काय परिणाम होणार याची देखील उत्सुकता आहे. याचा सत्याचा जयदीप आणि गौरीच्या नात्यावर काय परिणाम होणार हे देखील येणाऱ्या भागाताच समजणार आहे. तोपर्यंत प्रेक्षकांना वाट पाहावी लागणार आहे.
  View this post on Instagram

  A post shared by (@marathiserials_official)

  गौरीच्या आयुष्यात येणाऱ्या या नव्या वादळाचा गौरी कसा सामना करणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. या सगळ्यात जयदीप गौरीच्या बाजून उभा राहणार की तिची साथ सोडून देणार हे देखील लवकरच समजेल.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment, TV serials

  पुढील बातम्या