Home /News /entertainment /

'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत दोन चिमुकल्यांचे आगमन; नेमकी कुणाची आहेत ही मुलं?

'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत दोन चिमुकल्यांचे आगमन; नेमकी कुणाची आहेत ही मुलं?

नुकताच 'सुख म्हणजे नक्की काय असतं !' मालिकेत गौरी आणि जयदीपचा हनिमून ट्रॅक पाहायला मिळाला. अशातच मालिकेत दोन चिमुकल्यांचे आगमन होणार आहे. यांचे नुकतेच फोटो व्हायरल झाले आहेत.

  मुंबई, 18 जानेवारी- स्टार प्रवाह वाहिनीवरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं !' (sukh mhanje nakki kay asta )  ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील गौरी आणि जयदीप यांची जोडी प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. नुकताच मालिकेत गौरी आणि जयदीपचा हनिमून ट्रॅक पाहायला मिळाला. अशातच मालिकेत दोन चिमुकल्यांचे आगमन होणार आहे. यांचे नुकतेच फोटो व्हायरल झाले आहेत. मालिकेत जयदीप आणि गौरी यांच्यातील रोमॅंटिक क्षण दाखवण्यात येत आहेत. प्रेक्षकांना देखील या दोघांची केमिस्ट्री पाहायला आवडत आहे. आता जयदीप असाच संध्याकाळीच्या वेळी मायींच्या खोलीत त्यांचे पाय दाबत असतो. त्यावेळी त्या त्याला म्हणाल्या काय तुम्ही बाळाचा विचार करताय का..? तेव्हा जयदीप काहीसा लाजतो व म्हणतो की...ते दादाच आम्हाला तसं म्हणाले. यावर मायी म्हणतात की, त्यांनी म्हटंल नसत तर तुम्ही विचार केला नसता काय आणि सर्वजण हासायला लागतात. त्या पुढे म्हणतात देखील, चांगलीच गोष्ट आहे की, तुम्ही बाळाचा विचार करत आहात ही चांगली गोष्ट आहे. आता म्हातारपणात आम्हाला असलंच खेळणं पाहिजे, आपल्या हक्काचं, आपल्या रक्ताचं'...
  View this post on Instagram

  A post shared by Star Pravah (@star_pravah)

  त्यामुळे मालिकेत लवकरच गौरी आणि जयदीपच्या संसारात चिमुकल्याचे आगमन होणार का याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. स्टार प्रवाह वाहिनीनं याचा प्रोमो देखील आऊट केला आहे. प्रेक्षकांच्यात देखील याबद्दल उत्सुकता आहे. अनेकांनी हार्ट इमोजी पोस्ट करत प्रेम व्यक्त केलं आहे. मात्र गौरी आणि जयदीप यांच्या चिमुकल्याचे आगमन होण्यापूर्वी मालिकेत आता नवीन चिमुकल्यांचे आगमन होणार आहे. यांचे मायींसोबतचे काही फोटो देखील व्हायरल झाले आहेत.
  View this post on Instagram

  A post shared by (@marathiserials_official)

  एका पोर्टलने या चिमुकल्यांचे फोटो शेअर करत म्हटलं आहे की, देवकीच्या मुलं क्रिश आणि कशिश यांची एंट्री होणार आहे. या एंट्रीमागं काय कारण आहे याचा अद्याप उलगडा झाला नाही. मालिकेत देवकीची भूमिका मीनाक्षी राठोड साकारत आहे. तिचा तिच्या विनोदी अभिनयानं प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. ही भूमिका खरं तर विनोदी नसून खलनायिकेकडे झुकणारी आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment, TV serials

  पुढील बातम्या