Home /News /entertainment /

अभिनेत्री अश्विनी कासारने शेअर केला Sunday Motivational Video, चाहत्यांकडून होतोय कौतुकाचा वर्षाव

अभिनेत्री अश्विनी कासारने शेअर केला Sunday Motivational Video, चाहत्यांकडून होतोय कौतुकाचा वर्षाव

अभिनेत्री आश्विनी कासार सोशल मीडियावर (social media)बरीच सक्रिय असते. वेगवेगळे व्हिडीओ आणि फोटो ती चाहत्यांसोबत शेअर करत असते.

  मुंबई, 3 जुलै : छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे आश्विनी कासार(Ashwini kasar). आश्विनी सोशल मीडियावर (social media)बरीच सक्रिय असते. वेगवेगळे व्हिडीओ आणि फोटो ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. अशातच आश्विनीनं आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. sunday motivation म्हणत अभिनेत्रीनं हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर(ashwini kasar instagram) शेअर केलाय. अभिनेत्री आश्विनी कासारनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिचा लवचीकपणा पहायला मिळतोय. रविवारच्या दिवशी मोटिवेशन म्हणून तिनं हा व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे. तिच्या या व्हिडीओवर भरभरुन कमेंट आहेत. तिचं कौतुकही केलं जात आहे. हेही वाचा - Shivani Rangole: निव्वळ गुलाबी कॉटन कँडी! 'SHE' मधील रूपाचा नवा लुक पाहिलात का? स्टार प्रवाह वाहिनीवरील सुख म्हणजे नक्की काय असतं (Sukh mhanje nakki kay asta serial) ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील सगळ्याच पात्रांना खूप प्रेम मिळालं आहे. यातीलच एक पात्र म्हणजे मनू. या मालिकेत मनूची भूमिका अभिनेत्री अश्विनी कासार साकारत आहे. तिच्या या भूमिकेला चाहत्यांकडून खूप प्रेम मिळताना दिसतं. याशिवाय आश्विनीनं अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. कमला, सावित्री ज्योती, मोलकरीण बाई, कट्टी बट्टी, या मालिकांमध्ये तिनं महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. हिंदी मालिकांमध्येही आश्विनी झळकली आहे.
  अश्विनी कासार हिने रुईया कॉलेजमधून पदवीचे शिक्षण आणि त्यानंतर अश्विनीने वकिलीचे शिक्षण घेतले. आदर्श विद्यामंदिर शाळेत असताना तिने सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी दर्शवला होता. पुढे कॉलेजमध्ये असताना विविध नाटकांमध्येही सहभाग घेतला. आश्विनी एक अभिनेत्री तर आहेच आणखीन ती एक सुंदर डान्सर देखील आहे. याशिवाय ती एक लेखिका आणि वकिल पण आहे. अद्यापही आश्विनी नाटकांमध्ये सक्रिय असलेली पहायला मिळते. दरम्यान, अभिनय क्षेत्रात वेगवेगळ्या भूमिका साकारत, वेगवेगळ्या व्यक्तीरेखा साकारत तिनं चाहत्यांच्या मनात घर बनवलं आहे.
  Published by:Sayali Zarad
  First published:

  Tags: Entertainment, Instagram, Instagram post, Marathi actress, Marathi entertainment

  पुढील बातम्या