मुंबई, 26 ऑक्टोबर : :‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ (sukh mhanje nakki kay asta latest episode) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. मालिकेचं कथानक सध्या अतिशय रंजक वळणावर असून लवकरच मालिकेत कबड्डीचा सामनादेखील रंगणार आहे. शालिनीनं शिर्केपाटील कुटुंबाला प्रॉपर्टी परत मिळवण्यासाठी कबड्डीचा सामना जिंकण्याची अट घातली आहे. प्रॉपर्टी परत मिळवण्यासाठी कबड़्डीचा सामना होणार आहे. हा सामाना जिंकण्यासाठी शिर्केपाटील कुटुंब तयारीला देखील लागलं आहे. जयदीपनं देखील हे चांगलच मनावर घेतल आहे. जयदीपने (mandar jadhav)नुकताच एक सीन शूट केला सध्या या सीनची सगळीकडे चर्चा रंगली आहे. या सीनसाठी मालिकेच्या पूर्ण टीमने कशी मेहनत घेतली याचा एक व्हिडीओ नुकताच समोर आला आहे.
कबड्डीचा सामना जिंकायचा तर चांगला प्रशिक्षक हवा. याच प्रशिक्षकाचा शोध घेण्यासाठी जयदीप जंगलामध्ये गेला असताना एका संकटात सापडतो. झाडाला लावलेल्या फासात त्याचा पाय अडकला आणि तो उलटा टांगला गेला. अवघ्या काही मिनिटांच्या या सीनसाठी जयदीपची भूमिका साकारणाऱ्या मंदार जाधवनं बरीच मेहनत घेतली होती.
View this post on Instagram
हा सीन पाहून प्रेक्षक जयदीपचे कौतुक करत आहेत . मात्र प्रत्यक्षात हा सीन करण्यासाठी किती मेहनत घेतली याबद्दलचा एक व्हिडीओ मंदार जाधवने इन्स्टावर शेअर केला आहे. एका सीनसाठी कलाकारांना किती मेहनत आणि कष्ट करावं लगात याचं दर्शन या व्हिडीओतून होत आहे. तसेच टीव्हीवर दिसणाऱ्या एक सीनमागे किती जणांचे हात असतात याचा देखील यानिमित्त अनुभव येतो.
वाचा : Mann zaal Bajind : कृष्णाच्या परत येण्यामुळे राया -अंतराचं लग्न थांबणार का?
हा सीन शूट करणं अवघड तर होतंच आणि तितकंच जबाबदारीचं देखील होतं. फाइट मास्टर, दिग्दर्शकांच्या सूचना आणि सेटवरील सर्व मंडळींच्या सहकार्यानं मंदारनं हा अवघड सीन पूर्ण केला. प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी हे आव्हान स्वीकारल्याचं त्यानं सांगितलं. हा प्रसंग कायम लक्षात राहिल असंही तो म्हणाला.
वाचा : आई कुठे काय करते :अनिरूद्धच्या निर्णयामुळे देशमुखांच्या घराचे होणार दोन भाग ?
आता मालिकेत प्रशिक्षकाच्या रूपात एका नव्या पात्राची एंट्री (milind shinde entry as kabaddi coach) झाली आहे. ज्यामुळे मालिका आधिक रंगतदार झाली आहे. आतापर्यंत नकारात्मक भूमिकेत दिसणारे मिलिंद शिंदे आता या मालिकेत प्रशिक्षकाची भूमिका साकारताना दिसत आहे. या मालिकेतून त्यांच्या अभिनयाची एक वेगळी बाजू बघायला मिळत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.