मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'बाप झाल्यापासून तुझाही दुसरा जन्म झालाय', अभिनेत्रीनं नवऱ्याला दिल्या नवीन जन्म दिवसाच्या शुभेच्छा

'बाप झाल्यापासून तुझाही दुसरा जन्म झालाय', अभिनेत्रीनं नवऱ्याला दिल्या नवीन जन्म दिवसाच्या शुभेच्छा

'बाप झाल्यापासून तुझाही दुसरा जन्म झालाय', अभिनेत्रीनं नवऱ्याला दिल्या नवीन जन्म दिवसाच्या शुभेच्छा

'बाप झाल्यापासून तुझाही दुसरा जन्म झालाय', अभिनेत्रीनं नवऱ्याला दिल्या नवीन जन्म दिवसाच्या शुभेच्छा

आई बाबा झाल्यापासून अभिनेत्री मीनाक्षी राठोड (Meenakshi Rathod) आणि अभिनेता कैलाश वाघमारे (Kailash waghmare) दोघेही फार आनंदी आहेत. बाळाची काळजी घेण्यात दोघेही व्यस्त आहेत. दरम्यान मीनाक्षीनं नवऱ्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Minal Gurav

मुंबई, 03  जून:  'सुख म्हणजे नक्की काय असतं' (Sukh Mhanje Nakki Kay Asta) मालिकेतील सर्वांची लाडकी मॅड हेड म्हणजे देवकीनं (Devaki) सध्या मालिकेतून ब्रेक घेतला आहे. देवकी म्हणजेच अभिनेत्री मीनाक्षी राठोड (Meenakshi Rathod) काही दिवसांपूर्वीच आई झाली. मिनाक्षीला कन्यारत्न प्राप्त झालं. मिनाक्षीचा नवरा म्हणजे अभिनेता कैलाश वाघमारेनं ( Kailash Waghmare) सोशल मीडियावर बाळाचा फोटो शेअर सर्वांना आई बाबा झाल्याची गोड बातमी दिली.  आई बाबा झाल्यापासून दोघेही फार आनंदी आहेत. बाळाची काळजी घेण्यात दोघेही व्यस्त आहेत. असं असलं तरी दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असतात. सतत एकमेकांबद्दल आणि बाळाबद्दल माहिती ते चाहत्यांना देत असतात. असं असताना मिनाक्षी नवऱ्याला त्याच्या नवीन जन्म दिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. बरं कैलाशचा नवा वाढदिवस म्हणजे काय असा प्रश्न सर्वांना पडला असेल.

मीनाक्षी आणि कैलाश सध्या आपल्या बाळासोबत कॉलिटी टाइम घालवत आहेत. मिनाक्षीसोबत कैलाशही बाळाची सगळी जबाबदारी पार पाडत आहे. कैलाश आणि मुलीची आता चांगलीच गट्टी जमली आहे. दोघांच्या नात्यावर एक प्रेमळ पोस्ट लिहीत मिनाक्षीनं कैलाशचा दुसरा जन्म झाल्याचं म्हणत त्याला शुभेच्छा दिल्यात.

हेही वाचा - नायिकांनी घेतली लग्नासाठी सुट्टी, अन् मालिकांच्या TRPची झाली घसरगुंडी

मीनाक्षीनं म्हटलंय, 'बाळाला जन्म दिल्यानतंर आईचा दूसरा जन्म होतो असं म्हणतात. पण बाप झाल्यापासून तुझाही दूसरा जन्म झाल्यासारखा वाटतोय. म्हणूनच तर असं वेड्यासारखा वागतोय. मुलीसोबतचा हा नवीन वेडेपणा तुला मुबारक. नवीन जन्म दिवसाच्या खूप खूप सदिच्छा'.

मीनाक्षीनं पोस्ट लिहित मुलीसोबत कैलाशचा मस्ती करताचा एक गोड फोटो शेअर केला आहे. इतकचं नाही तर 'बाळाचा छान फोटो लवकरच टाकणार आहे', असं देखील मीनाक्षीनं तिच्या पोस्टच्या शेवटी म्हटलं आहे.  मीनाक्षीच्या या भन्नाट पोस्टनंतर चाहत्यांनी पटापट कैलाशच्या त्याच्या नव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात.

कैलाश आणि मीनाक्षी लवकरच मुलीचं बारस करणार आहेत. पण मुलीचं नाव काय ठेवायचं असा प्रश्न दोघांना पडला आहे. त्यावर उत्तर मिळवण्यासाठी कैलाशने त्यांच्या चाहत्यांची मदत घेतली. काही दिवसांआधीच कैलाशनं मुलीसोबतचा एक व्हिडीओ शेअर करत मुलींची नाव सुचवा असं आवाहन चाहत्यांना आवाहन केलं होतं. त्यानंतर कैलाशच्या व्हिडीओवर कमेंट करत चाहत्यांनी हजारो नावं त्याला सजेस्ट केली.

First published:

Tags: Daughter, Marathi actress, Marathi entertainment, Mother, TV serials