Home /News /entertainment /

मीनाक्षी राठोडने शेअर केला लेकीचा पहिला क्यूटवाला Video, चाहत्यांना म्हणाली, माझ्या मुलीसाठी....

मीनाक्षी राठोडने शेअर केला लेकीचा पहिला क्यूटवाला Video, चाहत्यांना म्हणाली, माझ्या मुलीसाठी....

अभिनेत्री मीनाक्षी राठोडला (Minakshi Rathod) नुकतंच कन्यारत्न (Blessed With Baby Girl) प्राप्त झालं आहे. मीनाक्षीने तिच्या लेकीचा पहिला क्यूटवाल व्हिडिओ नुकताच शेअर केला आहे.

    मुंबई, 28 मे- अभिनेत्री मीनाक्षी राठोडला (Minakshi Rathod) नुकतंच कन्यारत्न (Blessed With Baby Girl) प्राप्त झालं आहे. मीनाक्षीने तिच्या लेकीचा पहिला क्यूटवाल व्हिडिओ नुकताच शेअर केला आहे. शिवाय तिच्या लेकीसाठी खास पोस्ट देखील शेअर केली आहे. मीनाक्षी (Minakshi Rathod Baby Girl First Video )आणि कैलासला 10 मे 2022 रोजी कन्यारत्न प्राप्त झाले. आता मीनाक्षीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. मीनाक्षीने तिच्या लेकीचा पहिला क्यूट व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये कैलास लेकीसोबत खेळताना दिसत आहे. मीनाक्षीनं लेकीचा पहिला व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे की, जीतनी तू मीलती जाये उतनी लगे थोडी थोडी….❤️❤️🌹🌹 शिवाय तिनं माझ्या मुलीसाठी नाव सुचवा अशी विनंती देखील चाहत्यांना केली आहे. चाहत्यांकडून देखील या क्यूट व्हिडिओ कमेंटचा वर्षाव सुरू आहे. कुणी कैलाक्षी तर कुणी गाथा तर कुणी मायरा अशी वेगवेघळी नाव सध्या सुचवली आहेत. आता यापैकी कोणतं नाव मीनाक्षी ठेवणार याचा उलगडा देखील लवकरच होईल. वाचा-उमेश कामतनं प्रेक्षकांना दिली 'Bad News', प्रकरणाचं आहे राजकीय कनेक्शन मीनाक्षी राठोडचा पती कैलास वाघमारेने सोशल मीडिया पोस्ट करत सर्वांसोबत मुलगी झाल्याची गोड बातमी शेअर केली होती. त्याने बाळाच्या पायांचे ठसे असलेला एक फोटो शेअर केला होता. त्याला कॅप्शन देताना त्याने “माय” गोडगोजिरी होऊन परत आली !, असे म्हटले होते.
    स्टार प्रवाह वाहिनीवरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं' ( sukh mhanje nakki kay asta ) ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील व्यक्तिरेखानींही लोकांच्या मनात आपलं विशेष स्थान निर्माण केलं आहे. याच मालिकेतील देवकी ही भूमिका साकारणारी मीनाक्षी राठोड तिच्या विनोदी अभिनयानं प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसली होती. ही भूमिका खरं तर विनोदी नसून खलनायिकेकडे झुकणारी आहे. पण मीनाक्षीने तिच्या खास खट्याळ अंदाजाने या भूमिकेला विनोदी टच दिला होता. आता तिनं मालिकेतून ब्रेक घेतला आहे.
    Published by:News18 Trending Desk
    First published:

    Tags: Entertainment, Marathi entertainment

    पुढील बातम्या