Home /News /entertainment /

मीनाक्षी राठोडने शेअर केला लेकीचा पहिला फोटो, म्हणाली, 'हे जग खूप....'

मीनाक्षी राठोडने शेअर केला लेकीचा पहिला फोटो, म्हणाली, 'हे जग खूप....'

मीनाक्षीने तिच्या बाळाचा पहिला फोटो शेअर केला आहे. शिवाय तिच्या लेकीसाठी खास पोस्ट देखील शेअर केली आहे.

  मुंबई, 14 मे-  मागच्या काही दिवसांपासून अभिनेत्री मीनाक्षी राठोड सोशल मीडियावर तिच्या प्रेग्नेंशीमुळे चर्चेत आहे. मीनाक्षी राठोडला (Minakshi Rathod) नुकतंच कन्यारत्न (Blessed With Baby Girl) प्राप्त झालं आहे. मीनाक्षीने तिच्या बाळाचा पहिला फोटो शेअर केला आहे. शिवाय तिच्या लेकीसाठी खास पोस्ट देखील शेअर केली आहे. मीनाक्षी आणि कैलासला 10 मे 2022 रोजी कन्यारत्न प्राप्त झाले. आता मीनाक्षीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. मीनाक्षीने तिच्या लेकीसोबतचा पहिला फोटो पोस्ट केला आहे. यात तिच्या लेकीचा चेहरा दिसत नाही. या फोटोला तिनं सुंदर कॅप्शन देखील दिली आहे. तिनं म्हटलंय की, सगळयांनी किती प्रेमाने माझं स्वागत केलेय ! नक्कीच हे जग खूप प्रेमळ असावं! थैंक्यू. तिच्या या पोस्टवर चाहत्यांसह सेलब्सकडून कमेंटचा वर्षाव होत आहे. अनेकांनी तिचं अभिनंदन केलं आहे. PSI असलेली 'ही' अभिनेत्री लवकरच बांधणार लग्नगाठ, मेंदी आणि हळदीचा Video Viral मीनाक्षी राठोडचा पती कैलास वाघमारेने सोशल मीडिया पोस्ट करत सर्वांसोबत मुलगी झाल्याची गोड बातमी शेअर केली होती. त्याने बाळाच्या पायांचे ठसे असलेला एक फोटो शेअर केला होता. त्याला कॅप्शन देताना त्याने “माय” गोडगोजिरी होऊन परत आली !, असे म्हटले होते.
  स्टार प्रवाह वाहिनीवरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं' ( sukh mhanje nakki kay asta ) ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील व्यक्तिरेखानींही लोकांच्या मनात आपलं विशेष स्थान निर्माण केलं आहे. याच मालिकेतील देवकी ही भूमिका साकारणारी मीनाक्षी राठोड तिच्या विनोदी अभिनयानं प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसली होती. ही भूमिका खरं तर विनोदी नसून खलनायिकेकडे झुकणारी आहे. पण मीनाक्षीने तिच्या खास खट्याळ अंदाजाने या भूमिकेला विनोदी टच दिला होता. आता तिनं मालिकेतून ब्रेक घेतला आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment

  पुढील बातम्या