मुंबई, 20 मार्च : मराठी इंडस्ट्रीमध्ये अनेक भावंडांच्या जोड्या प्रसिद्ध झाल्या आहेत. खुशबू आणि तितिक्षा तावडे, मृण्मयी गौतमी देशपांडे सारख्या अनेक बहिण भावांच्या जोड्या प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आणि इंडस्ट्रीत प्रसिद्ध झाल्या. अशीच एक नवी जोडी मराठी टेलिव्हिजनवर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ती जोडी म्हणजे सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील जयदीप म्हणजेच अभिनेता मंदार जाधव आणि त्याचा भाऊ मेघन जाधव. दोन्ही भावांना स्टार प्रवाह वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. स्टार प्रवाहच्या नव्या मालिकेत मंदारच्या भावाची एंट्री झाली आहे. भावाच्या एंट्रीसाठी मंदार फार खुश आहे.
मंदार जाधवचा भाऊ मेघन जाधव हा स्टार प्रवाहवरील रंग माझा वेगळा या मालिकेत एंट्री करणार आहे. रंग माझा वेगळा ही मालिका स्टार प्रवाहवरील अनेक महिने नंबर 1 मालिका ठरली आहे. टीआरपीमध्ये देखील मालिकेनं नेहमीच अव्वल नंबरा मिळवला आहे. रंग माझा वेगळा ही मालिका सध्या 14 वर्षांनी पुढे सरकली आहे. मालिकेच मोठा लिप आला असून मालिकेतील दोन्ही मुली म्हणजे कार्तिकी आणि दीपिका आता मोठ्या झाल्या असून कार्तिक 14 वर्षांनी जेलमधून बाहेर आला आहे.
हेही वाचा - Madhurani Prabhulkar: 'जी खरंच सुपरस्टार होती तिला...' अरुंधतीला पुरस्कार मिळताच चाहत्याची 'ती' कमेंट चर्चेत
अभिनेता मेघन जाधव मालिकेत एक खास भूमिका करणार आहे. मालिकेचा नवा प्रोमो समोर आला असून मेघनची दमदार एंट्री दाखवण्यात आली आहे. मेघनच्या मालिकेचा प्रोमो शेअर करत अभिनेता मंदार जाधवनं भावासाठी खास पोस्ट लिहित प्रेक्षकांकडे एक मागणी देखील केली आहे.
View this post on Instagram
अभिनेता मंदार जाधवनं सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेचा प्रोमो शेअर करत लिहिलंय, "माझा भाऊ मेघन आज 'रंग माझा वेगळा' या मालिकेतून पदार्पण करतोय. माझ्यावर तुम्ही जे प्रेम करताय तसेच प्रेम त्याच्यावर सुद्धा करा" अभिनेता मेघन जाधवची 20 मार्चपासून रंग माझा वेगळा मालिकेत एंट्री झाली आहे.
मेघनची पहिलीच मराठी मालिका आहे. याआधी त्यानं अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे. सब टीव्ही वरील 'तेरा यार हू मै', 'तेनाली रामा'. त्याचप्रमाणे कलर्स टीव्हीवरील 'शुभारंभ', 'तंत्र', 'महाकाली', 'थोडासा बादल थोडासा पानी' आणि सोनी टीव्हीवरील 'सूर्यपुत्र कर्ण', सारख्या हिंदी मालिकेत मेघननं काम केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.