Home /News /entertainment /

रणबीरच्या 'शमशेरा'मध्ये दिसणार मराठमोळा अभिनेता; स्टार प्रवाहवर साकारतोय महत्त्वाची भूमिका

रणबीरच्या 'शमशेरा'मध्ये दिसणार मराठमोळा अभिनेता; स्टार प्रवाहवर साकारतोय महत्त्वाची भूमिका

22 जुलैला थिएटरमध्ये दाखल होणाऱ्या शमशेरा चित्रपटात एक मराठमोळा अभिनेताही प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. हा अभिनेता दररोज संध्याकाळी स्टार प्रवाहवर प्रेक्षकांच्या भेटीला येतो.

  मुंबई, 1 जुलै : अभिनेता रणबीर कपूरच्या 'शमशेरा' या (Shamshera look) आगामी चित्रपटाची चाहत्यांना बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा आहे. अभिनेता  रणबीर कपूर (Ranbir Kapoor), अभिनेत्री वाणी कपूर (Vaani Kapoor) आणि  संजय दत्त (Sanjay Dutt) अशी तगडी स्टार कास्ट असणारा 'शमशेरा' (Shamshera) चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  या चित्रपटात एक मराठमोळा अभिनेताही प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. हा अभिनेता दररोज संध्याकाळी स्टार प्रवाहवर प्रेक्षकांच्या भेटीला येतो.  22 जुलैला थिएटरमध्ये दाखल होणाऱ्या शमशेरा चित्रपटात मराठी अभिनेते सुनिल गोडसे  (Sunil godase)  झळकणार आहे. सुनिल गोडसे म्हणजेच सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील सर्वांचे लाडके दादा.  सुनिल गोडसे बॉलिवूड चित्रपटात दिसणार असल्यानं त्यांच्या चाहत्यांमध्ये एक वेगळा उत्साह पहायला मिळत आहे. चित्रपटातील त्यांची भूमिका किती दमदार असणार याकडे आता प्रेक्षकांचं लक्ष लागून आहे. सुनील गोडसेंनी अनेक मालिका, चित्रपटांतून काम करत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आपली वेगळी छाप त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर पाडली आहे. मराठीसोबतच हिंदी मालिका आणि चित्रपटातंही त्यांनी काम केलं आहे. सध्या ते सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत काम करत आहे. मालिकेतील दादासाहेबांची भूमिका त्यांनी उत्तमरित्या निभावली आहे. हेही वाचा - PHOTO: काय झाडी, काय डोंगर, वा दादा वा... ! आवडत्या गाण्यासह प्राजक्ता घेतेय निसर्गाचा आनंद
  View this post on Instagram

  A post shared by Sunil Godse (@suneel.godse)

  'शमशेरा' चित्रपटाची निर्मिती  आदित्य चोप्रानं केली आहे.  शमशेरा हा चित्रपट हिंदी बरोबरच तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये देखील रिलीज होणार आहे. चित्रपटाची उत्कंठा आणखीच वाढली असून चाहते आता चित्रपटासाठी प्रतीक्षा करू शकत नाहीत. चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक उत्साही असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर येत आहेत. दरम्यान, शमशेरा चित्रपटातील रणबीर कपूरचा लूक व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या लूकची जोरदार चर्चा सुरु असल्याचं पहायला मिळालं. बॉलिवूड सेलिब्रिटींची तगडी स्टार कास्ट असलेल्या ‘शमशेरा’मध्ये  मराठमोळा अभिनेताही रणबीर कपूरसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार असल्याचं प्रेक्षकांनी आनंद व्यक्त केलाय.
  Published by:Sayali Zarad
  First published:

  Tags: Bollywood, Bollywood News, Entertainment, Ranbir kapoor

  पुढील बातम्या