मीनाक्षी मुळची जालन्याची आहे. तिच्या अभिनयाची सुरुवात शाळेपासून झाली आहे. तिचे वडील कलाप्रेमी असल्यामुळे नाटक, अभिनय, नृत्य स्पर्धांमध्ये तिला आवर्जून भाग घ्यायला सांगायचे. कॉलेजमध्ये असताना युथ फेस्टिव्हलमध्येही ती नियमितपणे सहभागी व्हायची. परंतु तिचा अभिनयप्रवास सुरू झाला ती मुंबईला आली तेव्हापासून. अथक प्रयत्नांनंतर तिला 'शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला' या प्रसिद्ध नाटकात सावित्रीबाई यांची भूमिका मिळाली. या नाटकादरम्यान अभिनय म्हणजे नक्की काय हे तिला उमगत गेलं. या नाटकाचे त्यांनी पाच वर्षांत जवळपास साडे सातशे प्रयोग केले. इथून तिच्या करिअरला वेग मिळाला. तिच्या 'खिसा' नावाच्या लघुपटाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. वाचा-'तुझ्या माझ्या संसाराला..' मधील या अभिनेत्रीचा मालिकेला रामराम मीनाक्षीचा नवरा कैलाश वाघमारे हादेखील एक उत्तम अभिनेता आहे. त्या दोघांनी मिळून कॉलेजमध्ये असताना अभिनय प्रवासाला सुरुवात केली होती.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.