मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील या अभिनेत्याचा झाला साखरपुडा

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील या अभिनेत्याचा झाला साखरपुडा

'सुख म्हणजे नक्की काय असतं' (Sukh Mhanje Nakki Kay Asta) मालिकेत उदय शिर्के पाटील(Uday Shirke Patil) ही भूमिका साकारणारा अभिनेता संजय पाटील (Actor Sanjay Patil Engagement) नुकताच साखरपुडा झाला आहे.

'सुख म्हणजे नक्की काय असतं' (Sukh Mhanje Nakki Kay Asta) मालिकेत उदय शिर्के पाटील(Uday Shirke Patil) ही भूमिका साकारणारा अभिनेता संजय पाटील (Actor Sanjay Patil Engagement) नुकताच साखरपुडा झाला आहे.

'सुख म्हणजे नक्की काय असतं' (Sukh Mhanje Nakki Kay Asta) मालिकेत उदय शिर्के पाटील(Uday Shirke Patil) ही भूमिका साकारणारा अभिनेता संजय पाटील (Actor Sanjay Patil Engagement) नुकताच साखरपुडा झाला आहे.

मुंबई, 9 नोव्हेंबर- छोट्या पडद्यावरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं' (Sukh Mhanje Nakki Kay Asta) ही लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील सर्वच व्यक्तिरेखा लोकप्रिय आहेत. मालिकेत उदय शिर्के पाटील(Uday Shirke Patil) ही भूमिका साकारणारा अभिनेता संजय पाटील (Actor Sanjay Patil Engagement) नुकताच साखरपुडा झाला आहे. त्याने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे.

अभिनेता संजय पाटील याने इन्स्टाग्रामवर त्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत काही फोटो पोस्ट केले आहेत. अबोली गोखले असे त्याच्या होणाऱ्या पत्नीचे नाव आहे. “माझे आयुष्य सुंदर करणारी परी आहेस तू, मनापासून तुझ्यावर जीव लावणाऱ्या या हृदयाची राणी आहेस तू,” असे कॅप्शन देत त्याने त्याच्या पत्नीसोबत फोटो पोस्ट शेअर केले आहे.

वाचा :हणम्याची होणार एक्झिट?; 'ती परत आलीये' मालिकेत मोठा ट्विस्ट

संजय आणि अबोलीचा साखरपुडा हा 5नोव्हेंबर 2021रोजी पार पडला. “आजपासून मी कधीही एकटा चालणार नाही,” असेही त्याने हे फोटो शेअर करताना म्हटले आहे. अबोली ही एक वेलनेस ब्लॉगर आहे. तसेच ती पोषणतज्ञ, योग सल्लागारही आहे. या दोघांच्या साखरपुड्याचे फोटोंवर चाहत्यांकडून  शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.  साखरपुडा झाला तरी लग्नाची तरीख संजयने अद्याप जाहीर केलेली नाही.

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’(Sukh Mhanje Nakki Kay Asta) ही छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मालिकेत गौरी आणि जयदीप यांची अनोखी प्रेमकहाणी दाखवण्यात आली आहे. सध्या सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका नव्या वळणावर आहे. कमी काळात मालिकेने प्रेक्षकांचे मन जिकलं आहे.

वाचा: ‘मन उडू उडू झालं’ मालिकेतील अभिनेत्याच्या कारला भीषण अपघात

सध्या सगळीकडे लगीनघाई जोरात सुरू आहे. बॉलिवूडपासून ते मराठी कलाविश्वात अनेक कलाकारांच्या घरात लगीनघाई सुरू आहे. विकी कौशल्या व कतरिना तर आलिया रणबीर यासोबतच राजकुमार राव आणि पत्रलेखा यंदा लगीनगाठ बांधणार असल्याची चर्चा आहे. तरी मराठी कलाविश्वात नुकतचं सुयश टिळक आणि आयुषी भावे हिच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे.

First published:

Tags: Entertainment, Marathi entertainment, TV serials